vodafone idea vi zoom 45 percent in 6 days hits new 52 week high know about reason
Vi ची जबरदस्त कामगिरी! शेअर्समध्ये अचानक ४५ टक्क्यांची वाढ; नेमकं कारण काय? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 4:46 PM1 / 9गेल्या काही दिवसांपासून टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्या आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेडच्या दरात वाढ केली आहे. यामुळे एकीकडे महागाईने त्रस्त असताना ग्राहकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. 2 / 9भारतातील आघाडीच्या तीन स्पर्धक मोबाईल आपरेटर कंपन्यांनी गेल्या महिनाअखेर दरवाढ केली. संबंधित कंपन्याचे कॅल रेट वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशावर भार पडणार आहे. मात्र वाढीव महसुलाचा फायदा या कंपन्यांना होईल.3 / 9मात्र, यातच आता व्होडाफोन-आयडिया म्हणजेच Vi चे शेअर्स अचानक वाढल्याचे दिसून आले आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ४५ टक्क्यांची उसळी पाहायला मिळत आहे. Vi ने घेतलेले निर्णय कंपनीच्या पथ्यावर पडत असल्याचे बोलले जात आहे. 4 / 9नव्या आठवड्याची सुरुवात करतानाच कंपनीच्या शेअरने सकाळी थेट १५.१० रुपयांवर दस्तक दिली. गेल्या सप्ताहअखेर तो १४.४५ रुपयांवर स्थिरावला होता. वर्षभरात तो १३.७० रुपयांपर्यंतच पोहोचू शकला होता. तर १७ आगस्ट २०२१ तो ५.७० अशा वार्षिक तळात होता.5 / 9गेल्या सलगच्या काही वाढीमुळे मात्र त्याने आता पुन्हा उभारी घेतली आहे. त्याचबरोबर आणखी एक वेगळे कारण आहे. केंद्रीय दूरसंचार विभागाने स्टॅक मार्केटमध्ये लिस्टेड असलेल्या व्होडाफोन आयडियाची बँक हमी मंजूर केल्याच्या अंतर्गत वृत्ताने कंपनीच्या शेअरचे पुनर्ज्जीवन मानले जाते.6 / 9लायसन्स फी आणि स्पेक्ट्रम यूजेस चार्जेसपोटी सरकारच्या दफ्तरी जमा असलेल्या ९,२०० कोटी रुपयांची बँक हमी सरकारने मंजूर करणे कर्जाचा मोठा भार असलेल्या कंपनीसाठी खूपच महत्त्वाचे आहे. शुल्क आणि कर तिढ्याबाबतचा कंपनीचा सरकारबरोबरचा संघर्ष अद्यापही कायम आहे.7 / 9Vi चा शेअर गेल्या सलग चार दिवसात जवळपास ४५ टक्क्यांनी वाढला आहे. तर आता त्याचा स्तर हा गेल्या ३१ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर आहे. दरम्यान, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, टेलिकॉम कंपन्या पोस्टपेड टॅरिफमध्ये जितका उशीर करतील, तितका कंपन्यांना अधिक तोटा होईल. 8 / 9जर Airtel आणि Vodafone Idea ने ग्राहकांसाठी पोस्टपेड प्लॅन्स महाग केले, तरी ग्राहकांसाठी ब्रँड प्राधान्य, उत्तम अनुभव अधिक महत्त्वाचा असल्याने ते इतरत्र कुठेही जाण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.9 / 9Vi च्या प्रीपेड प्लॅन्सच्या नव्या किंमती लागू झाल्या आहेत. कंपनीनं आपल्या प्रीपेड प्लॅन्समध्ये ५०० रूपयांपर्यंतची वाढ केली आहे. टॅरिफ वाढवल्यानंतर युझर्सना डेटा आणि फ्री कॉलिंग असलेल्या अनलिमिटेड प्लॅन्ससोबतच अॅड ऑन पॅक्ससाठीही अधिक पैसे खर्च करावे लागणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications