शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vodafone-Idea चा २०० रूपयांपेक्षा स्वस्त प्लॅन; रोज मिळणार Unlimited Calling, डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 12:14 PM

1 / 8
सध्या Airtel, Reliance Jio, Vodafone-Idea या कंपन्या ग्राहकांना टिकवण्यासाठी आणि आपल्याकडे नवे ग्राहक आकर्षित करण्यासाठी नवनव्या ऑफर्स आणत आहेत. व्होडाफोन आयडिया ही कंपनीदेखील आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवे स्वस्त प्रीपेड प्लॅन्स ऑफर करत आहे.
2 / 8
ज्या ग्राहकांचा डेटाचा वापर कमी आहे, त्यांच्यासाठी कंपनी दररोज १ जीबी पर्यंतचे प्लॅन्स आणले आहेत. आज अशाच काही प्लॅन्सबद्दल जाणून घेऊया ज्यांचा खर्च २०० रूपये किंवा त्यापेक्षा खर्च कमी आहे. यामध्ये डेटासोबत मोफत कॉलिंगही ऑफर केलं जात आहे.
3 / 8
व्होडाफोन आयडिया आपल्या ग्राहकांसाठी २०० रूपयांपेक्षा स्वस्त १९९ रूपयांचा प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना २४ दिवसांची वैधता देत आहे. यामध्ये कंपनी ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग देत आहे. यासोबत OTT प्लॅटफॉर्म्सचं बेनिफिट्स देण्यात येत आहे.
4 / 8
याचाच अर्थ २०० रूपयांमध्ये तुम्हाला जवळपास महिनाभर चालणारा प्लॅन मइळणार आहे. यामध्ये मिळणाऱ्या सुविधांकडे पाहिलं तर यात दररोज १ जीबी डेटा देण्यात येतो. याप्रकारे या पॅकसोबत कंपनी ग्राहकांना २४ जीबी डेटा देते.
5 / 8
प्लॅनमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. यात दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. या व्यतिरिक्त कंपनी ग्राहकांना Vi Movies & TV Basic चा मोफत अॅक्सेस देण्यात येतो. तसंच या ठिकाणी ग्राहकाना मुव्हीज आणि शो चा आनंद घेता येतो.
6 / 8
व्होडाफोन आयडिया या प्लॅनसोबत वीकेंड डेटा रोलओव्हर आणि मोफत नाईट डेटा यासारख्या सुविधा देत नाही. कंपनी अशा प्रकारच्या सुविधांसोबत एक २८ दिवसांचा प्लॅनही ऑफर करत आहे. यामध्ये ग्राहकांना अतिरिक्त २० रूपये द्यावे लागतात.
7 / 8
Vodafone-Idea चा २१९ रूपयांचा प्लॅन हा १९९ रूपयांच्या प्लॅनप्रमाणेच आहे. यामध्ये कंपनी ग्राहकांना २८ दिवसांची वैधता देते. यामध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा ऑफर करण्यात येतो. परंतु एका ऑफर अंतर्गत कंपनी ग्राहकांना २ जीबी अतिरिक्त डेटा देत आहे.
8 / 8
या प्लॅनसोबत कंपनी ग्राहकांना एकूण ३० जीबी डेटा देत आहे. तसंच या प्लॅनमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस पाठवण्याचीही सुविधा देते. याशिवाय ग्राहकांना Vi Movies & TV Basic चं मोफत अॅक्सेसही देण्यात येत आहे.
टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIdeaआयडियाAirtelएअरटेलReliance Jioरिलायन्स जिओ