शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पहिल्या 8 वर्षात फक्त 30 कोटी, पुढील 4 वर्षात कमावले तब्बल 1000 कोटी रुपये...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 7:57 PM

1 / 9
Vu TV Success Story : बिजनेस करना और उसे सफल बनाना, दोनों दो ध्रुवों की तरह हैं. एक छोर से दूसरे छोर तक पहुंचने का रास्‍ता बहुत उतार-चढ़ाव से गुजरता है और ऐसा बहुत बार होता है, जब शुरू करके उसे सफलता तक पहुंचाने से पहले आपको तमाम दुश्‍वारियों की वजह से असफल होना पड़ता है. जो इस यात्रा में टिका रहता है, उसे सफलता की मंजिल जरूर मिलती है.
2 / 9
Vu TV Success Story : आज उद्योग क्षेत्रात महिलांचाही बोलबाला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला उद्योगात पुढे जात आहेत. आज आम्ही हजार कोटींच्या कंपनीची मालकीण देविता सराफ यांच्याबद्दल सांगणार आहोत. देवीताचा जन्म व्यावसायिक कुटुंबात झाला, त्यामुळे तिच्या रक्तातच व्यवसायाची जाण आहे. पण, आपला व्यवसाय वाढवण्यासाठी तिला बरीच वर्षे वाट पाहावी लागली. परिस्थिती अशी होती की, तिच्या कंपनीने पहिल्या 8 वर्षात फक्त 30 कोटींचा व्यवसाय केला. पण, त्यानंतरच्या 4 वर्षातच कंपनीने तब्बल 1000 कोटींचा पल्ला गाठला.
3 / 9
देविताचे कुटुंब पूर्वीपासूनच संगणक निर्मिती क्षेत्राशी संबंधित होते, त्यामुळे भविष्यात याच क्षेत्राशी निगडीत व्यवसाय करण्याचा विचार देविताच्या मनात होता. यासाठी तिने वयाच्या 16व्या वर्षीच व्यवसायातील बारकावे शिकण्यास सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ समजून घेण्यासाठी तिने कॅलिफोर्नियातील व्यवसायाचाही अभ्यास केला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर देविताने आपल्या पिढीच्या एक पाऊल पुढे टाकले आणि टेलिव्हिजन क्षेत्रात उडी घेतली.
4 / 9
लोकांना आधुनिक तंत्रज्ञान असलेला टीव्ही देण्यासाठी देविताने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी VU टीव्ही कंपनीची स्थापना केली. त्या काळात लोक स्मार्ट टीव्हीचा फारसा विचार करत नव्हते. पण, देविता सराफने हार मानली नाही आणि आपल्या कंपनीच्या वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले. तिच्या प्रयत्नांना यश आले आणि आज देविता VU ग्रुपच्या सीईओ आहेत. त्यांची कंपनीचे व्हॅल्यूएशन तब्बल 1000 कोटी रुपयांचे आहे. फॉर्च्युनने 2019 मधील देशातील 50 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत दिवेताचा समावेश केला आहे.
5 / 9
कोण आहे देविता सराफ? उत्तर प्रदेशातील मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या देविता सांगतात की, त्यांचे वडील राजकुमार सराफ झेनिथ कॉम्प्युटर्स नावाचा व्यवसाय चालवायचे. ही एक टेक्नॉलॉजी कंपनी होती, त्यामुळे या क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याचा विचार त्यांच्या मनात आला होता. त्या आपल्या वडिलांच्या कंपनीत जायच्या, तिथूनच त्यांना व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळाली.
6 / 9
काहीतरी वेगळं करण्याच्या इराद्याने त्या अमेरिकेत गेल्या, परत आल्यानंतर नवीन तंत्रज्ञानाची उत्पादने बनवण्यावर लक्ष केंद्रित केले. विदेशी कंपन्या प्रीमियम उत्पादने बनवतात, तर भारतीय कंपन्या स्वस्त उत्पादनांना प्राधान्य देत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. 2006 मध्ये त्यांनी Vu Televisions नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीने उच्च दर्जाची उत्पादने वापरण्यास सुरुवात केली आणि मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा केली.
7 / 9
देविताने सांगितले की, काहीतरी नवीन करण्यासाठी त्यांनी टीव्ही आणि कॉम्प्युटरची वैशिष्ट्ये एकत्र करून एक प्रगत टीव्ही तयार केला. यामध्ये यूट्यूब, ओटीटी प्लॅटफॉर्मसह D2H चॅनेलचाही आनंद घेता येत होता. 2006 मध्ये हे उत्पादन लोकांपर्यंत नेणे आणि त्यांना एका नवीन कंपनीचा टीव्ही घेण्यासाठी पटवून देणे, हे मोठे आव्हान होते. त्यामुळे देविताला कंपनीच्या वाढीसाठी बराच काळ वाट पाहावी लागली.
8 / 9
देवीता सांगतात की कंपनी 2006 मध्ये स्थापन झाली होती आणि तिचा विस्तार करण्यासाठी 8 वर्षांपेक्षा जास्त वेळ लागला. दिवेतासमोर माघार घेण्याचा पर्याय नव्हता. यानंतर 2014 मध्ये कंपनीने वेग पकडला. सुरुवातीला परिस्थिती अशी होती की, पहिल्या 8 वर्षांत कंपनीने फक्त 30 कोटींचा व्यवसाय केला होता. पण, पुढील 4 वर्षातच 1000 कोटी रुपयांचा पल्ला गाठला.
9 / 9
देविता सराफचा तरुण उद्योजकांसाठी एक संदेश आहे. ती सांगते की, नव्या पिढीला व्यवसायात उतरायचे असेल तर त्यांनी जोखीम पत्करण्यास घाबरू नये. तुम्हाला व्यवसायात स्वत:ला सिद्ध करायचे असेल, तर तुम्हाला जोखमीतून जावेच लागेल. डोळ्यासमोर एक ध्येक ठेवून काम करत राहा, उशिरा का होईना, पण तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच मिळेल.
टॅग्स :Televisionटेलिव्हिजनbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूकMONEYपैसा