Wadia group rebrands GoAir as GoFirst in run up to its IPO investment money
GoAir नं IPO साठी केला अर्ज; ३६०० कोटी रूपये जमवण्याची तयारी By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 4:29 PM1 / 15वाडिया समुगाची विमान कंपनी GoAir नं आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीनं सेबीकडे अर्जही दाखल केला आहे. 2 / 15कंपनीनं १३ मे रोजी GoAir चं Go First या नावानं रिब्रँडिंग केलं होतं. विमान कंपनीचं रिब्रँडिंग हे या IPO आणण्याच्या तयारीचाच एक भाग असल्याचं म्हटलं जात आहे. 3 / 15सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशातील विमानांच्या उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांना मोठं नुकसान सोसावं लागत आहे.4 / 15GoAir ची सुरूवात २००५ मध्ये करण्यात आली होती. कंपनीच्या ताफ्यात ५० पेक्षा अधिक विमानं आहेत.5 / 15याची स्पर्धक कंपनी IndiGO चा व्यवसाय एका वर्षानंतर सुरू करण्यात आला होता. परंतु त्यांच्या ताफ्यात GoAir पेक्षा पाच पट अधिक विमानं आहेत. 6 / 15कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाऊनमुळे गेल्या १४ महिन्यांपासून विमान कंपन्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. 7 / 15CNBC-TV18 नं मार्च महिन्यात GoAir एअर हे यावर्षी एप्रिल महिन्यात ड्राफ्ट हेरिंग प्रॉस्पेक्टर (DRHP) दाखल करू शकतं असं म्हटलं होचतं. 8 / 15GoAir नं नियामक सेबीकडे जो DRHP दाखल केल्या आहे त्यामध्ये Go First ड्रेटमार्क आणि लोगोच्या रजिस्ट्रेशनसाठीही अर्ज केला आहे.9 / 15कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी यापूर्वी ब्रँड नेम आणि ट्रेडमार्कचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. 10 / 15नव्या ब्रँड अंतर्गत आम्ही संपूर्ण व्यवस्थापनात बदल केला आहे. नव्या ब्रँडमुळे आम्ही उत्तम प्रकारे ग्राहकांना जोडू शकतो असंही GoAir नं म्हटलं आहे. 11 / 15कंपनीनं आपल्या महत्त्वाकांक्षी विस्तार करण्याच्या योजेनेसाठी निधी जमा करण्यासाठी एक इनिशिअल शेअर सेलची तयारी केल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.12 / 15अल्ट्रा-लो-कॉस्टच्या (ULCC) रूपात Go First आपल्या ताफ्यात सिंगल एअरक्राफ्टप्रमाणे संचालन करेल. 13 / 15सध्या एव्हिएशन मार्केटमध्ये Go Air चा गिस्सा ७.८ टक्के इतका होता.14 / 15पहिल्यांदा जून २०१४ मध्ये या विमान कंपनीचा एव्हिएशन मार्केटमध्ये हिस्सा १० टक्क्यांच्या पुढे गेला होता.15 / 15काही बाबी सोडल्यान तर गेल्या वर्षी कोरोनाची महासाथ येईपर्यंत हा हिस्सा १० टक्क्यांच्या जवळपासच होता. आणखी वाचा Subscribe to Notifications