walmart struck a deal with six year old millionaire ryan
6 वर्षाच्या चिमुकल्याने केलं वॉलमार्टसोबत डील, कमाई ऐकाल तर थक्क व्हाल By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 3:02 PM1 / 8यू-ट्यूबवर प्रसिद्ध झालेला 6 वर्षाचा रयान आता स्टोर बिझनेसमध्ये पाऊल ठेवणार आहे. रयानने वॉलमार्टसोबत एक डील केलं आहे. हा सहा वर्षाचा चिमुकला लाखो रुपये कसे कमावतो आणि हे डील नेमकं काय ते जाणून घेऊया...2 / 8रयान पॉकेट डॉट वॉचसोबत काम करतो. रयानला आवडणारी खेळणी आणि कपडे रयान्स वर्ल्ड नावाने विकले जातात. 3 / 8रयानने वॉलमार्टसोबत एक डील केलं आहे. त्यानूसार रयान्स वर्ल्डची खेळणी वॉलमार्टचे 2500 अमेरिकी स्टोर आणि वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. 4 / 8रयान यू-ट्यूबवर वेगवेगळ्या खेळण्यांचा रिव्ह्यू देणारे व्हिडीओ पोस्ट करत असतो. गेल्या वर्षी त्याने यामधून 11 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 75 कोटींची कमाई केली होती. 5 / 8यू-ट्यूब स्टार रयानचं टॉयज रिव्ह्यू असं एक चॅनल असून त्याचे 15 मिलियन सबस्क्रायबर आहेत. तसेच गेल्या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या यू-ट्यूबरमध्ये रयान आठव्या स्थानी होता. 6 / 8रयानच्या एका व्हिडीओला हजारो नाही तर करोडो लाईक्स येत असतात. रयान तीन वर्षाचा असल्यापासून त्याचे वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करण्यास सुरुवात झाली. 7 / 8रयानचा पहिला यूट्यूब व्हिडीओ हा मार्च 2015 मध्ये आला होता. यामध्ये तीन वर्षाचा रयान एका लेगो बॉक्ससोबत खेळताना दिसला होता. 8 / 8पॉकेट वॉच या वेबसाईटनेही रयानसोबत एक डील केलं आहे. यामध्ये ही वेबसाईट रयानचे व्हिडीओ वापरून खेळणी आणि कपडे लहान मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करते. आणखी वाचा Subscribe to Notifications