शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

परवडणारं घर घ्यायचंय? गेल्या दोन वर्षात बदललेली परिस्थिती पाहा अन् ठरवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 10:02 AM

1 / 8
स्वत:च्या मालकीचं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी अर्थातच गृहकर्ज घेतलं जातं. मात्र कोरोनामुळे अर्थव्यवस्थेने बसकण मारल्यानं घरं आणि गृहकर्ज या दोन्हींची मागणी मंदावली होती. कोरोनागमनामुळे सध्या मागी धोर धरू लागल्याचे चित्र आहे. त्यातही परवडणाऱ्या घरांची मागणी जोरदार आहे.
2 / 8
कोरोनामुळे दोन वर्षात परवडणाऱ्या घरांचा पुरवठा आटला होता. परंतु याच कालावधीत परवडणाऱ्या घरांच्या मागणीत घसघशीत वाढ झाली.
3 / 8
२०२० सालच्या पहिल्या तिमाहीत २,३४,६०० इतकी परवडणाऱ्या घरांची उपलब्धता होती. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत हाच आकडा २,१७,६३० इतका झाला. तर २०२२ च्या पहिल्या तिमाहीत त्यात घट होऊन १,८६,१५० वर पोहोचला आहे.
4 / 8
विक्री न झालेल्या आलिशान घरांची आकडेवारी पाहिली तर राजधानी दिल्लीत २०२० सालच्या पहिल्या तिमाहीत ७,३१० आलिशान घरं विकली गेली नव्हती. तर २०२१ मध्ये पहिल्या तिमाहीत ७,७४० घरांवर हा आकडा पोहोचला. आता २०२२ च्या पहिल्या तिमाहीत दिल्लीत न विकलेल्या आलिशान घरांचा आकडा ७,९८० इतका झाला आहे.
5 / 8
मुंबईत न विकेलेल्या आलिशान घरांच्या आकडेवारीत २०२० च्या पहिल्या तिमाहीत मुंबईत २४,३७० आलिशान घरं विकली गेली नव्हती. तर २०२१ मध्ये याच काळात हा आकडा २३,९५० इतका झाला. तर २०२२ च्या पहिल्या तिमाहीत मुंबईतील न विकलेल्या आलिशान घरांचा आकडा २०,४८० इतका आहे. पुण्यात हाच आकडा २०२० साली १,५५० इतका होता. २०२१ मध्ये १,५६० आणि २०२२ च्या पहिल्या तिमाहीत १,५८० इतका आहे.
6 / 8
२०२० च्या पहिल्या तिमाहीत ४१,७५० आलिशान घरांची विक्री झाली होती. हेच प्रमाण २०२२ च्या पहिल्या तिमाहीत ३९,८१० वर आहे. कोलाकाता आणि मुंबई महानगर क्षेत्र या ठिकाणी आलिशान घरांच्या विक्रीत अनुक्रमे १६ आणि १५ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.
7 / 8
२.५ कोटींहून कमी किंमत असलेल्या घरांची मागणी ७ शहरांमध्ये घटली आहे. तर परवडणाऱ्या घरांना चेन्नई, पुणे, मुंबई येथे सर्वाधिक मागणी आहे.
8 / 8
२०२० च्या पहिल्या तिमाहीपासून २०२२ च्या पहिल्या तिमाहीच्या अखेरपर्यंत परवडणाऱ्या घरांची उपलब्धता २१ टक्क्यांनी कमी झाली आहे. याचाच अर्थ परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे.
टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजन