Want to be a millionaire? Use the formula of mathematics, easily become rich!
कोट्यधीश व्हायचंय? गणिताच्या 'या' फॉर्म्युल्याचा वापर करा, सहज बनाल श्रीमंत! By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2022 6:39 PM1 / 12प्रत्येक व्यक्तीचं श्रीमंत होण्याचं स्वप्न असतं. परंतु तो बनतोच असे नाही. श्रीमंत न बनण्यासाठी तो नशीब आणि वेळेला दोष देत राहतो. परंतु हे योग्य नाही. श्रीमंत बनण्यासाठी काही तुमच्या प्लॅनिंगवरही निर्भर असते. 2 / 12जर तुम्ही कमाईसोबतच गुंतवणूक योग्य प्रकारे करत असाल तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कुणी रोखू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला गणिताचे काही असे फॉर्म्युले सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्हीही सहजपणे श्रीमंत होऊ शकता. 3 / 12आपल्या सगळ्यांकडे आर्थिक शिस्त एकसारखी नसते. प्रत्येकजण आपापल्यापरिने कमाई, खर्च आणि गुंतवणूक करत असतो. याच आधारे आम्ही तुम्हाला गणिताचे चार फॉर्म्युले सांगणार आहोत. तुम्ही सध्या कुठल्या गटात आहात हे खालील दिलेल्या फॉर्म्युल्यावर ठरवू शकता. 4 / 12हे फॉर्म्युले पाहून तुमच्यात काय बदल आवश्यक आहेत हेदेखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक म्हणजे. उत्पन्न (उत्पन्न-I) – बचत (बचत-S) = खर्च (खर्च-E) म्हणजे (I-S=E) या फॉर्म्युल्यानुसार, अशा लोकांना ठेवता येते जे आधीच बचतीसाठी आपल्या उत्पन्नाचा काही भाग काढून घेतात. त्यानंतर उरलेली रक्कम तो खर्च करतात. ते काढलेले पैसे बचत बँक खात्यात किंवा कमी जोखमीच्या गुंतवणूक माध्यमात गुंतवतात.5 / 12२. उत्पन्न-खर्च = बचत (I–E = S) या फॉर्म्युलामध्ये ते लोक बसतात ज्यांचा विश्वास आहे की, आधी कमाई करा आणि मग तुमच्या गरजेनुसार खर्च करा. जर काही शिल्लक असेल तर मी ते गुंतवीन. अशा लोकांकडे बचतीच्या नावावर फारच तुटपुंजी रक्कम जमा केली जाते.6 / 12३. उत्पन्न + कर्ज = खर्च (I+L = E) आजच्या तरुण पिढीचा या सूत्रावर विश्वास आहे. या अंतर्गत तरुण आपले एकूण उत्पन्न म्हणजेच कमाई खर्च करतात आणि नंतर खर्चासाठी कर्ज घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत.7 / 12जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला हे सूत्र फॉलो करावे लागेल १. उत्पन्न–गुंतवणूक = खर्च (I–I = E) जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला वरील सूत्रानुसार आर्थिक नियोजन करावे लागेल. 8 / 12या फॉर्म्युला अंतर्गत, तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याचा आणि शक्य तितक्या लवकर गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजेच उत्पन्नासह, प्रथम गुंतवणूक करा. त्यानंतर, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे काही शिल्लक आहे ते खर्च करा. 9 / 12बहुतेक लोकांना हे सूत्र माहित असले तरी ते लागू करत नाहीत. जर तुम्ही हा फॉर्म्युला पाळलात तर पैसा तुमच्या मागे येईल, पैशामागे तुम्हाला धावण्याची गरज भासणार नाही. हे तुम्हाला श्रीमंत होण्यास मदत करेल10 / 12या टिप्स तुमच्या सवयीमध्ये जोडा - पैसा जमा करण्यात किंवा श्रीमंत होण्यात तुमची सवय मोठी भूमिका बजावते. तुम्हाला तुमच्या सवयीमध्ये समाविष्ट करावे लागेल: १. नियोजन, २. बजेट, ३. शिकणे, ४. कमाई, ५. बचत आणि ६. गुंतवणूक. 11 / 12नेहमी लक्षात ठेवा की, श्रीमंत होण्यासाठी कठोर आर्थिक शिस्त लागते. तुम्हाला स्वतःहून समजत नसेल, तर तुम्ही आर्थिक नियोजकाची मदत घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या गोष्टींवर बारकाईनं अंमलबजावणी करावी लागेल. 12 / 12खर्चावर नियंत्रण ठेवा, आर्थिक शिस्त पाळा, सर्व खर्च लिहून घेणे सुरू करा, क्रेडिट कार्डचा वापर कमीत कमी करा, फालतू खर्च थांबवा, उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत तयार करा, हुशारीने गुंतवणूक करा, पोर्टफोलिओमध्ये इक्विटी, रिअल इस्टेट आणि लहान बचत योजनांचा समावेश करा आणखी वाचा Subscribe to Notifications