शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Twitter ची ब्ल्यू टिक हवी की लखपती बनायचंय? सबस्क्रिप्शनच्या पैशात मिळेल बंपर रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 12:41 PM

1 / 7
ट्विटर ब्लू टिक सेवा भारतात सुरू झाली आहे. आता ट्विटर ब्लू टिक मिळवण्यासाठी लोकांना खिसा रिकामा करावा लागणार आहे. ट्विटरने विना ब्ल्यू सबस्क्रिप्शनच्या प्रोफाईलवरून ब्लू व्हेरिफिकेशन बॅज काढून टाकला आहे.
2 / 7
जर तुम्ही Android आणि iOS युझर असाल तर तुम्हाला दरमहा ९०० रुपये द्यावे लागतील. तसंच वेब युझर्ससाठी दरमहा ६५० रुपये द्यावे लागतील. तुम्ही ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनचा वार्षिक प्लॅन घेतला तर त्याची किंमत ६,८०० रुपये असेल.
3 / 7
त्याचा मासिक खर्च सुमारे ५६६.६७ रुपये असेल. पण जर तुम्ही ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनची सेवा न घेता हे पैसे गुंतवले तर तुम्ही लखपती होऊ शकता. तुम्ही चांगला बँक बॅलन्सही जमा करू शकता.
4 / 7
तुम्ही दरमहा ९०० रुपयांची बचत करून २ लाख रुपयांपेक्षा जास्त निधी जमा करू शकता. त्यासाठी नियोजनातून गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणुकीच्या धोरणानुसार म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय असेल.
5 / 7
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची वेळ खूप महत्त्वाची असते. गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम फॉर्म्युला म्हणजे SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. याद्वारे तुम्हाला तुमचा बँक बॅलन्स वाढवता येईल. जर तुम्ही १० वर्षांसाठी दर महिन्याला ९०० रुपये गुंतवले आणि त्यावर १२ टक्के व्याज मिळालं तर तुमचा २.०९ लाखांचा निधी जमा होईल.
6 / 7
दरम्यान, तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी अधिक गुंतवणूक करण्याची गरज नाही. कमी गुंतवणुकीतही तुम्ही मोठ्या प्रमाणात निधी सहज जमा करू शकता, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
7 / 7
यासाठी तुम्हाला गुंतवणुकीच्या योग्य पद्धतींची माहिती हवी. तुम्ही ९०० ऐवजी यापेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास या हिशोबानुसार तुम्हाला दहा वर्षांत अधिक बंपर परतावा मिळेल. (टीप - यामध्ये केवळ माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
टॅग्स :MONEYपैसाInvestmentगुंतवणूकTwitterट्विटर