Warning ... Don't download these 19 apps
सावधानतेचा इशारा... अँड्रॉईड युजर्संने या 19 अॅपला डाऊनलोड करु नये By महेश गलांडे | Published: October 24, 2020 6:03 PM1 / 12मोबाईल युजर्संना सातत्याने धोकादायक अॅप संदर्भात माहिती देण्यात येत असते. सुरक्षेच्या कारणास्तव काही अॅप डाऊनलोड न करण्याचे सांगण्यात येतं. 2 / 12अँड्रॉयड युजर्ससाठी प्ले स्टोरवर लाखो अॅप्स आहेत. त्यातील आवश्यक असेल तर ते डाउनलोड करू शकतात. परंतु, युजर्संना आता एक इशारा दिला आहे. काही अॅप्स डाउनलोड करण्यासारखे नाहीत. ते तुम्ही चुकूनही डाउनलोड करू नका.3 / 12गुगल प्ले स्टोरवरील अशा 19 अॅप्सची माहिती समोर आली आहे. जे युजर्संना नुकसान पोहोचवण्यासाठी आले आहेत. त्यामुळे हे अॅप्स पाहा आणि चुकूनही डाउनलोड करू नका.4 / 12मोदी सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव 52 चायना अॅप बॅन केले होते, त्यानंतर आणखी 120 अॅप्सना भारतात बंदी घालण्यात आले. त्यामध्ये, पब्ज या गेमिंग अॅपचाही समावेश होता. 5 / 12आताही, गेमिंग्जशी संबंधित अॅप्स डाऊनलोड न करण्याचं आवाहन करण्यात आलंय, अँटी व्हायरस कंपनी Avast च्या सिक्यॉरिटी टीमकडून हा इशारा देण्यात आला आहे.6 / 12 कंपनीने सांगितले की, गुगलच्या अधिकृत प्ले स्टोरवर अनेक अॅप्सची माहिती उघड झाली आहे. जे युजर्संच्या फोनमध्ये खूप सारे ऐडवेयर इन्स्टॉर करतात. 7 / 12अँड्रॉयड युजर्संना लक्ष्य करतात. अशा एकूण 21 ऐडवेयर पॅक्ड अॅप्सची माहिती उघड झाली आहे. यातील तीन अॅप्सला गुगलने हटवले आहे. परंतु, अवास्टच्याय माहितीनुसार, अजूनही 19 अॅप्सची तपासणी सुरू आहे. सध्या हे अॅप्स युजर्ससाठी प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत8 / 12अनेक अॅप्स हे फन गेम्स आहेत. जसे कार रेसिंग पासून हेलिकॉप्टर ते क्रिमिनलला शूट करणे किंवा व्हर्च्यूअल कपडे उतरवणे यासारखे ऑप्शन देते. समोर आलेले असे अॅप्स प्रसिद्ध आहेत. 9 / 12आतापर्यंत याला ८० लाखांहून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. एकदा हे अॅप्स डाउनलोड झाल्यानंतर HiddenAds Trojan ओरिजनल अॅप बंद झाल्यानंतर खूप साऱ्या जाहिराती दिसू लागतात. 10 / 12हा जाहिराती नोटिफिकेशन्स ते फुल स्क्रीन पर्यंत असू शकतात. त्यामुळे अँड्रॉईड युजर्संने या अॅप्सला मोबाईलमध्ये डाऊनलोड करू नये, असे सांगण्यात आलंय. 11 / 12हे अॅप्स वापरु नका - Shoot Them, Crush Car, Rolling Scroll, Helicopter Attack, Assassin Legend, 2020 NEW, Helicopter Shoot, Rugby Pass, Flying Skateboard, Iron it12 / 12हे अॅप्स वापरु नका -Shooting Run, Plant Monster, Find Hidden, Find 5 Differences, Rotate Shape, Jump Jump, Find the Differences, Puzzle Game, Sway Man, Desert Against, Money Destroyer आणखी वाचा Subscribe to Notifications