शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Weekly Gold Price: आनंदाची बातमी! सोनं-चांदी अचानक इतके स्वस्त झालं! २४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 2:02 PM

1 / 9
Weekly Gold Price: गेल्या काही महिन्यांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली, आता दरात काहीशी घट झाली आहे. पण, तरीही किंमत ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या वर आहे.
2 / 9
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या दरात वाढ नोंदवली जात आहे. या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहारा दिवशी शुक्रवारी सोन्याचा दर ६०,४४६ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला.
3 / 9
गुरूवार, १३ एप्रिल, २०२३ रोजी, गेल्या आठवड्यातील शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, तो ६०,७४३ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला. आठवडाभर सोन्याचा भाव ६०,००० रुपयांच्या वर राहिला.
4 / 9
या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी सोन्याचा भाव ६०,७०९ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला. मंगळवारी किमती ६०,४७९ रुपयांवर बंद झाल्या.
5 / 9
बुधवारी सोन्याचा दर ६०,३७३ रुपये प्रति १० ग्रॅम, गुरुवारी ६०,५१७ आणि शुक्रवारी ६०,४४६ वर बंद झाला. गेला आठवडाभर सोनं-चांदीचा भाव वाढतच राहिला होता.
6 / 9
गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहारा दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव ६०,४४६ रुपयांवर बंद झाला होता. या आठवड्यात सोन्याचा भाव २९७ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाला आहे.
7 / 9
या आठवड्यात सोमवारी सोन्याची सर्वात महाग किंमत ६०,७०९ रुपये प्रति १० ग्रॅम आणि बुधवारी सर्वात कमी किंमत ६०,३७३ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता.
8 / 9
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, २० एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याची किंमत कमाल ६०,६१६ रुपये होती. २२ कॅरेट सोन्याचा भाव ६०,३७३ रुपये होता.यात कराची रक्कम वाढवून वाढ होऊ शकते.
9 / 9
सोन्यावरील जीएसटी चार्जेस वेगळे भरावे लागतात. याशिवाय दागिन्यांवर मेकिंग चार्जही आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या प्रमाणित किमतीची माहिती देतात.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी