शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुरुंगात गेला, नंतर वडिलांच्या पावलावर पाऊल; आज परिचयाचं आहे नाव, नेटवर्थ ६६५६ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 9:48 AM

1 / 8
ड्वेन जॉन्सन हा त्या लोकांपैकी एक आहे ज्यांच्यामुळे भारतात WWE प्रसिद्ध आहे. हे नाव ऐकून कदाचित तुम्ही गोंधळला असाल. या WWE रेसलरला द रॉक म्हणून आपण ओळखतो. त्याचे वडिलही रेसलरच होते. त्यांचं नाव रॉकी जॉन्सन (खरं नाव वेड डग्लस बाउल्स) होतं.
2 / 8
द रॉक हे WWE इतिहासातील सर्वात मोठं नाव आहे. त्यानं व्यावसायिक कुस्तीतच नाव कमावले नाही तर चित्रपट आणि व्यवसायातही यश मिळवलंय. एकेकाळी चोरीसारख्या गुन्ह्यात तुरुंगात गेलेला रॉक आज हजारो कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे.
3 / 8
रॉकचा रेसलिंगमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय त्याला झालेल्या दुखापतींमुळे झाला. तो अमेरिकन फुटबॉल खेळायचा पण त्यादरम्यान त्याला खूप दुखापती झाल्या, त्यामुळे त्याचा प्लेईंग टाईम कमी झाला. यानंतर त्यानं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. रॉकसाठी व्यावसायिक यात येणं कठीण काम नव्हतं. कदाचित आपण जगभरात इतके प्रसिद्ध होऊ असं त्यालाही वाटलं नसावं.
4 / 8
द रॉकचे पूर्ण नाव ड्वेन डग्लस जॉन्सन आहे. त्याचा जन्म १९७२ मध्ये कॅलिफोर्नियामध्ये झाला. तो काही काळ न्यूझीलंडमध्येही राहिला होता. तो तिथे रग्बी खेळायचा. अमेरिकेत परतल्यानंतर त्याने मियामी विद्यापीठासाठी फुटबॉल खेळायला सुरुवात केली.
5 / 8
यानंतर त्याला कॅनडियन फुटबॉल लीगमध्ये कॅल्गरी स्टॅम्पेडर्सनं घेतलं. परंतु सातत्यानं होणाऱ्या दुखापतींमुळे त्याची ही कारकीर्द लहान राहिली. द रॉक हा श्रीमंत घराण्यातला असला तरी लहानपणी काही कारणांमुळे त्याला तुरुंगात जावं लागलं. मारामारी, चोरी, फसवणूक याप्रकरणी त्याला तुरुंगात हवा खावी लागली होती.
6 / 8
दरम्यान, फुटबॉल करिअरमध्ये उतरती कळा लागल्यानंतर त्यानं आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. १९९६ मध्ये, त्याने WWF (आता WWE) मध्ये प्रवेश केला. त्याचं पहिले नाव रॉकी मेव्हिया होतं. त्याची अप्रतिम शरीरयष्टी, बोलण्याची पद्धत, माईक कंट्रोल आणि त्याचं बॅड बॉय कॅरेक्टरमुळे तो प्रसिद्ध होत गेला. रिंगमधील आणि बाहेरील त्याच्या डायलॉग्सनं त्याला आणखी प्रसिद्धी मिळाली.
7 / 8
द रॉकला मिळालेले यश फार कमी रेसलर्सना मिळालं आहे. प्रोफेशनल रेसलिंगमधून तो चित्रपटांकडे वळला. २००२ मध्ये त्यानं पहिला चित्रपट 'द ममी रिटर्न्स' केला. या चित्रपटासाठी त्याला ५० लाख डॉलर्स मिळाल्याचं म्हटलं जात आहे. यानंतर तो अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसला. फास्ट अँड फ्युरियसचाही यात समावेश आहे. अलीकडेच त्याला नेटफ्लिक्सवर आलेल्या रेड नोटिससाठी ५ कोटी डॉलर्स मिळाले.
8 / 8
ड्वेन जॉन्सनच्या संपत्तीत झपाट्यानं वाढ झाली आहे. त्यानं २ वर्षात त्याची एकूण संपत्ती दुप्पट केली. फोर्ब्सच्या मते, त्याची एकूण संपत्ती सध्या ८० कोटी डॉलर्सआहे. भारतीय चलनात हे ६६५६ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. ड्वेन जॉन्सनची स्वतःची प्रोडक्शन कंपनी आहे. तो एका टकीला कंपनीचाही मालक आहे. याशिवाय अंडर आर्मर, अॅपल आणि यूएफसी सारख्या मोठ्या ब्रँडचा तो ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहेत.
टॅग्स :businessव्यवसायWWEडब्लू डब्लू ई