शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Home Loan चे सलग तीन EMI भरता आले नाहीत तर काय होतं? एक नोटीस आणि बँक घेते ही अ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 11:07 AM

1 / 9
आपलं स्वत:चं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण बहुदा आपण बँकेकडून कर्ज घेऊन आपलं हे स्वप्न पूर्ण करतो. परंतु काही वेळा काही कारणास्तव या कर्जाचे हफ्ते फेडणं शक्य होत नाही. अशातच मग आपल्यासमोर समस्या उभी राहते. परंतु ईएमआय भरता आला नाही तर काय होतं माहितीये? किती ईएमआयपर्यंत बँक वाट पाहते आणि नंतर कारवाई करते.
2 / 9
होम लोन हे सिक्युअर लोनच्या श्रेणीत ठेवलं जातं. याच्या बदल्यात तुम्हाला बँकेकडे आपली संपत्ती गहाण ठेवावी लागते. परंतु होम लोन भरण्यास तुम्ही असमर्थ असाल तर त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या कोणत्या गाईडलाईन्स आहेत हे पाहूया.
3 / 9
जर तुम्हाला तुमचा एक ईएमआय भरता आला नाही, तर बँक किंवा वित्तीय संस्था अशी परिस्थिती अतिशय गंभीरतेनं घेत नाही. कोणत्या कारणामुळे ईएमआय भरण्यास उशिर होत असल्याची बँकेची धारणा होते.
4 / 9
परंतु ग्राहकानं सातत्यानं दुसरा ईएमआय भरला नाही, तर बँक सर्वप्रथम एक रिमांईंडर पाठवते. यानंतरही ग्राहकांनी तिसरा ईएमआय भरला नाही, तर बँक कर्ज फेडण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवते.
5 / 9
अशाप्रकारे तिसरा ईएमआय भरता आला नाही, तर बँक कारवाई सुरू करते. कायदेशीर नोटीस नंतर तुम्ही ईएमआय फेडला नाही तर बँक ग्राहकांना डिफॉल्टर घोषित करते. यासोबतच बँक लोन अकाऊंट एनपीए मानते. अन्य वित्तीय संस्थांच्या प्रकरणात ही मर्यादा १२० दिवसांची असते. या नंतर बँक वसूली प्रक्रियेबाबत विचार करते.
6 / 9
सिक्युअर्ड लोनमध्ये मालमत्ता गहाण ठेवली जाते, जेणेकरून कर्ज न भरल्यास, बँक ती मालमत्ता विकून कर्ज वसूल करू शकते. मात्र, बँकेच्या बाजूनं हा शेवटचा पर्याय असतो. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कर्जाची परतफेड करण्यासाठी ग्राहकाला बराच वेळ दिला जातो. कायदेशीररीत्या बँकेला त्यांचे पैसे परत मिळवण्याचा शेवटचा पर्याय म्हणजे त्या मालमत्तेचा लिलाव.
7 / 9
तीन महिन्यांचा ईएमआय न भरल्यानस तो भरण्यासाठी बँक ग्राहकांना आणखी दोन महिन्यांची मुदत देते. यानंतरही ग्राहकांना ईएमआय भरता आला नाही, तर त्यांना एका मूल्यासह नोटीस पाठवली जाते. जर ग्राहक लिलावाच्या तारखेपूर्वी म्हणजेच लिलावाची नोटीस मिळाल्याच्या एक महिन्या नंतरही ईएमआय भरत नाही, तर बँक लिलावाच्या प्रक्रियेसह पुढे जाते.
8 / 9
दरम्यान, ६ महिन्यांमध्ये रक्कम भरून हे प्रकरण सोडवलं जाऊ शकतं. परंतु वेळेवर लोन न फेडल्यास बँक ग्राहकांना डिफॉल्ट घोषित करते. यामुळे ग्राहकाचा सिबिल स्कोअरही खराब होतो आणि भविष्यात कर्ज घेताना समस्या निर्माण होऊ शकतात.
9 / 9
जर ईएमआय भरण्यास समस्या येत असतील तर यासाठी काही उपायही आहेत. तुम्ही ज्या ठिकाणाहून कर्ज घेतलंय तिकडे संपर्क साधून तुमच्या प्राधान्यक्रमानुसार कर्जाची पुनर्रचना करू शकता. ग्राहक बँकांना आपल्या समस्या सांगू शकतात, तसंच कागदपत्रेही सादर करू शकतात. पुनर्रचनेमुळे काही महिन्यांपर्यंत ईएमआय पुढे जाणं किंवा रक्कम कमी करण्यास मदत मिळेल. पण तुमच्या कर्जाचा कालावधी वाढू शकतो.
टॅग्स :bankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक