शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

RBI च्या नवीन नियमांचा तुमच्या क्रेडिट कार्ड लिमिटवर कसा परिणाम होईल? वाचा सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 10:58 AM

1 / 6
क्रेडिट कार्डसोबत मिळणाऱ्या शानदार फीचर्समुळे त्याचा वापर सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. परंतू काही क्रेडिट कार्ड वापरणारे लोक त्याबाबत असलेल्या महत्त्वाच्या फीचर्सबद्दल अनभिज्ञ आहेत. जर तुमच्याकडे १ लाख रुपयांचे लिमिट असलेले क्रेडिट कार्ड आहे, ज्याद्वारे तुम्ही ८० हजार रुपयांचा व्यवहार केला.
2 / 6
आता अचानक तुमच्याकडे एक महत्त्वाचे काम आहे. यासाठी तुम्हाला १ लाख रुपयांचा संपूर्ण व्यवहार करायचा आहे. तर अशा परिस्थितीत तुम्ही ८० हजार रुपयांचे बिल भरून पुन्हा १ लाख रुपयांचा व्यवहार करू शकता का? आरबीआयच्याच्या नवीन क्रेडिट रिपोर्टिंग नियमांनुसार हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न बनला आहे.
3 / 6
तज्ज्ञांच्या मते, सध्या तुमच्या कार्डचे लिमिट क्रेडिट कार्डचे बिल भरल्यानंतर काही वेळातच रिस्टोर केले जाते, म्हणजेच तुम्ही बिल भरल्यानंतर काही वेळानंतरच त्याचे पूर्ण लिमिट वापरू शकता. इतकंच नाही तर तुम्ही बिलिंग सायकलमध्ये संपूर्ण कार्ड बिल भरले नाही तरीही तुम्ही लिमिटपेक्षा जास्त व्यवहार करू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला चार्ज द्यावा लागेल.
4 / 6
समजा, कार्ड जारीकर्ता ५०० रुपयांच्या किमान फीसह ओव्हरलिमिट रकमेच्या २.५ टक्के चार्ज आकारतो. हे चार्ज बिलिंग सायकलमध्ये एकदा लागू केले जाऊ शकते. तुमच्या कार्डवर ओव्हरलिमिट व्यवहारांना परवानगी आहे की नाही आणि तसे असल्यास, त्यासाठी तुम्हाला किती चार्ज आकारले जाईल, हे समजून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या बँक किंवा कार्ड जारी करणाऱ्या कंपनीशी बोलू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या कार्डचे लिमिट वाढवण्यासाठीही अर्ज करू शकता.
5 / 6
बँकेला आता तुमच्या क्रेडिट हॅबिट्सचा रिपोर्ट क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (CIBIL) किंवा Experian ला द्यावा लागेल, तर पूर्वी बँक मंथली फ्रिक्वेंसीचे रेकॉर्ड देत असे. याचा अर्थ असा की तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये एका महिन्याच्या कालावधीत संभाव्य चढ-उतार होऊ शकतात, जे पूर्वी असे नव्हते.
6 / 6
समजा, तुम्ही तुमच्या कार्ड मर्यादेच्या ८० टक्के वापर केला आहे, ज्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर थोडा कमी होऊ शकतो. परंतु जर तुम्हाला बिलिंग सायकल संपण्यापूर्वी आणि बिल तयार होण्यापूर्वी बिल भरायचे असेल, तर त्याचा तुमच्या स्कोअरवर विशेष परिणाम होणार नाही.
टॅग्स :businessव्यवसायbankबँक