शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय आहे PM किसान सन्मान निधी स्कीम? काय आहे फायदे, कोण घेऊ शकत नाही बेनिफिट; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 9:21 AM

1 / 9
PM Kisan Samman Nidhi Scheme : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत सरकारची विशेष योजना आहे. यासाठी पूर्णपणे भारत सरकारकडून निधी दिला जातो. या योजनेअंतर्गत सर्व भू-धारक शेतकरी कुटुंबांना तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक ६००० रुपयांचं सहाय्य दिलं जातं.
2 / 9
या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलं अशी आहे. या योजनेंतर्गत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडून मदतीसाठी लाभार्थी म्हणजेच पात्र शेतकरी कुटुंबांची निवड केली जाते. याअंतर्गत हप्त्याची रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.
3 / 9
सीएससीच्या माध्यमातून तुम्ही यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे आधार कार्ड, जमीन मालकी पत्र आणि बचत बँक खातं असणे आवश्यक आहे. सीएससीवर, व्हीएलई राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव यासारख्या शेतकरी नोंदणी तपशील टाकले जातात. प्रमाणपत्रासाठी आधार कार्डवर छापलेला आधार क्रमांक, लाभार्थीचे नाव, प्रवर्ग, बँक तपशील, जमीन नोंदणी आयडी आणि जन्मतारीख याची माहिती द्यावी लागेल.
4 / 9
त्यानंतर, व्हीएलई जमीन मालकी कागदपत्रांमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्वेक्षण क्रमांक, खसरा क्रमांक आणि जमिनीचे क्षेत्रफळ यासारखे जमिनीचे तपशील भरेल. यानंतर तो जमीन, आधार आणि बँक पासबुक सारखी कागदपत्रे अपलोड करेल. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन स्वीकारलं जातं आणि अर्ज सेव्ह केला जातो. अर्ज सेव्ह केल्यानंतर सीएससी आयडीद्वारे पेमेंट करावे लागेल. आधार क्रमांकाचा वापर करून तुम्ही लाभार्थी स्थिती तपासू शकता.
5 / 9
मजबूत आर्थिक स्थिती असलेले काही प्रवर्गातील लाभार्थी पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या लाभासाठी पात्र नाहीत. सर्व संस्थात्मक जमीनधारक. शेतकरी कुटुंबे जी एक किंवा अधिक गोष्टींशी संबंधित असतील. जसे की तो घटनात्मक पदांचे माजी आणि सध्याचे धारक असतील. माजी व विद्यमान मंत्री/राज्यमंत्री व लोकसभा/राज्यसभा/राज्य विधानमंडळे/राज्य विधान परिषदेचे माजी/विद्यमान सदस्य, महानगरपालिकेचे माजी व विद्यमान महापौर, जिल्हा पंचायतींचे माजी व विद्यमान सभापती यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
6 / 9
याव्यतिरिक्त, केंद्र / राज्य सरकारची मंत्रालयं / कार्यालयं / विभाग आणि त्याच्या क्षेत्रीय युनिट्स, केंद्र किंवा राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सरकारच्या अखत्यारीतील संलग्न कार्यालयं / स्वायत्त संस्थांमधील सर्व सेवारत किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियमित कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ / चतुर्थ श्रेणी / गट ड कर्मचारी वगळून) यांनाही किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेता येत नाही.
7 / 9
तसंच १०,००० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक मासिक पेन्शन असलेले सर्व निवृत्त/निवृत्त पेन्शनधारक (मल्टी टास्किंग स्टाफ/चतुर्थ/गट ड कर्मचारी वगळून). ज्या व्यक्तींनी गेल्या आयकर भरला आहे. तसंच नोंदणीकृत डॉक्टर, इंजिनीअर, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट आणि आर्किटेक्ट यांसारखे व्यावसायिक आणि प्रॅक्टिस करून आपला व्यवसाय चालविणारे या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत.
8 / 9
कसं तपासू शकता स्टेटस? - पीएम किसान योजना अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा. त्यानंतर 'Know Your Status' वर क्लिक करा. नंतर नोंदणी क्रमांक भरा. यानंतर स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा प्रविष्ट करा. सर्व माहिती भरा आणि Get Details वर क्लिक करा. आता तुम्हाला स्क्रीनवर स्टेटस दिसेल.
9 / 9
आता जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही अधिकृत वेबसाइट pmkisan-ict@gov.in वर फार्मर्स कॉर्नरमधील हेल्प डेस्कला भेट देऊन समस्या सोडवू शकता. हेल्प डेस्कवर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक, बँक खातं क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक टाका आणि फॉर्म भरून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. याशिवाय तुम्ही तुम्ही हेल्पलाइन नंबर ०१२०-६०२५१०९, ०११-२४३००६०६ वर कॉल करू शकता. तुम्ही PM किसान हेल्पलाइन नंबर १५५२६१ वर कॉल करू शकता.
टॅग्स :FarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाNarendra Modiनरेंद्र मोदी