What is 'Prime Minister Suryaday Yojana'? The electricity bill of the house will be zero rupees
'पंतप्रधान सूर्यादय योजना' काय आहे? घरचं वीज बिल शून्य रुपये येणार, योजनेचा लाभ असा घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 7:06 PM1 / 9पंतप्रधान सूर्यादय योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवू शकता. यामुळे तुमचे वीज बिल शून्य रुपयांवर येऊ शकते. 2 / 9सोलर पॅनेलला एकदाच खर्च करुन बसवून घेतल्यानंतर तुम्हाला वीज बिलाच्या टेन्शनपासून मुक्ती मिळणार आहे. आता यासाठी केंद्र सरकारने एक योजनाही आणली आहे.या योजनेला 'पंतप्रधान सूर्यवंशी योजना' असं नाव देण्यात आले आहे. 3 / 9या योजनेच्या माध्यमातून एक कोटी घरांवर सोलर पॅनेल बसवण्याचे लक्ष्य असल्याचे मोदींनी म्हटले आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला ४० टक्के सबसीडीवर सोलर पॅनेल बसवता येणार आहे. 4 / 9या योजनेचा लाभ फक्त ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांनाच पंतप्रधान सूर्यादय योजनेचा लाभ घेता येणार आहे.5 / 9जर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून सोलर पॅनेल जोडायचे असेल तर तुम्हाला आधी नॅशनल पोर्टल फॉर रुफटॉप सोलर'च्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. 6 / 9या नोंदणीनंतर तुम्हाला रुफटॉप सोलर पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि लॉग इन करावे लागेल. या पुढे तुम्हाला रुफटॉपसाठी अर्ज करावा लागणार आहे. 7 / 9यात तुम्हाला काही प्रश्न विचारले जाणार आहेत. यात योग्य माहिती भरावी लागणार आहे अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. 8 / 9तुम्ही तुमच्या घरावर जर सोलर पॅनेल बसवून घेतले तर तुम्हाला महावितरणच्या वीजेची गरज लागणार नाही. यामुळे तुम्हाला महिन्याला वीज बिल येणार नाही. 9 / 9गेल्या काही दिवसापासून वीज बिलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या योजनेमुळे सर्वसामान्याना दिलासा मिळणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications