शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

DLF's Rajiv Singh: देशातील सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट व्यवसायिक राजीव सिंग यांची सॅलरी किती? आता ३८% ची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 9:08 AM

1 / 6
तुम्ही कधी ना कधी रिअल इस्टेट कंपनी डीएलएफचं नाव ऐकलंच असेल. या कंपनीच्या अध्यक्षपदाची धुरा राजीव सिंग यांच्या खांद्यावर आहे. तुम्हाला त्यांचं वेतन किती आहे माहितीये? रिअल इस्टेट कंपनी डीएलएफचे अध्यक्ष राजीव सिंह यांना २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी २७.३० कोटी रुपयांचं पॅकेज मिळालं आहे.
2 / 6
वार्षिक आधारावर हे प्रमाण ३८ टक्क्यांनी अधिक आहे. डीएलएफचे अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालक राजीव सिंग यांना गेल्या आर्थिक वर्षासाठी २७.३० कोटी रुपये मानधन मिळालं आहे. तर २०२२-२३ या आर्थिक वर्षात ती १९.७७ कोटी रुपये होता.
3 / 6
नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रोहे-हुरुन रँकिंगमध्ये ६५ वर्षीय सिंग १,२४,४२० कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट टायकून ठरले आहेत. डीएलएफचं बाजारमूल्य दोन लाख कोटी रुपये इतकं आहे.
4 / 6
दोन लाख कोटी बाजार मूल्य असलेली टॉप रिअल इस्टेट कंपनी आहे. डीएलएफचे अध्यक्ष राजीव सिंग यांना ग्रोहे-हुरुन इंडिया रिअल इस्टेट लिस्ट २०२३ मध्ये सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट उद्योजक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
5 / 6
वार्षिक अहवालानुसार, डीएलएफचे एमडी आणि सीएफओ अशोक कुमार त्यागी यांना २०२३-२४ साठी वेतन पॅकेज म्हणून १३.५२ कोटी रुपये मिळाले आहेत. जे आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील १०.६४ कोटी रुपयांपेक्षा २७ टक्के जास्त आहे.
6 / 6
त्यागी यांची व्यवस्थापकीय संचालक पदाच्या विद्यमान भूमिकेव्यतिरिक्त १३ मे २०२४ पासून कंपनीचे सीएफओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डीएलएफनं दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या कार्यकारी संचालकांना वेतन, लाभ, भत्ते आणि कमिशनच्या स्वरूपात मानधन देते. नामनिर्देशन व मानधन समितीच्या (एनआरसी) शिफारशींच्या आधारे संचालक मंडळाकडून वार्षिक वेतनवाढीला मान्यता दिली जाते.
टॅग्स :businessव्यवसाय