What to do if you have too much credit card debt? Here is the solution with personal loan
क्रेडिट कार्डचे कर्ज जास्त झाल्यास काय कराल? हा आहे उपाय By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 12:31 PM1 / 7बहुतेक क्रेडिट कार्डांवर ३०-४२ टक्के व्याज द्यावे लागते. इतर कोणत्याही कर्जावर यापेक्षा जास्त व्याज नाही. मात्र, नियमित कर्जाची परतफेड करून अधिक व्याज देण्याचे टाळू शकता.2 / 7चक्रवाढ व्याजाचे गणित समजून घ्या समजा एखाद्या व्यक्तीचे क्रेडिट कार्डचे बिल १०,००० रुपये बाकी आहे आणि त्यावर ४२ टक्के व्याज आकारले जाईल. त्यावर दर महिन्याला सुमारे ३.५ टक्क्यांनी व्याज वाढेल. तुमच्या संपूर्ण रकमेवर (१०,००० रुपये) दर महिन्याला व्याज आकारले जाईल. 3 / 7त्यामुळे तुम्हाला केवळ एका महिन्यासाठी १७५० रुपये व्याज द्यावे लागेल. आणि विलंब शुल्क आकारले जाईल ते वेगळे आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डवरील व्याज झपाट्याने वाढते. 4 / 7पर्सनल लोन चांगले ? जर तुम्हाला क्रेडिट कार्डची थकबाकी फेडण्यात अडचण येत असेल, तर पर्सनल लोन हा चांगला पर्याय आहे. कारण बँकांकडून पर्सनल लोन फक्त १२ ते १४ टक्के व्याजाने मिळेल, तर क्रेडिट कार्डच्या थकबाकीवर ३० ते ४२ टक्के व्याज द्यावे लागते. 5 / 7पर्सनल लोन चांगले ? जर तुम्हाला क्रेडिट कार्डची थकबाकी फेडण्यात अडचण येत असेल, तर पर्सनल लोन हा चांगला पर्याय आहे. कारण बँकांकडून पर्सनल लोन फक्त १२ ते १४ टक्के व्याजाने मिळेल, तर क्रेडिट कार्डच्या थकबाकीवर ३० ते ४२ टक्के व्याज द्यावे लागते. 6 / 7ईएमआयही चांगला क्रेडिट कार्ड बिल भरण्याचा दुसरा मार्ग म्हणजे क्रेडिट कार्ड असलेल्या कंपनीशी बोलणे आणि थकबाकीची रक्कम ईएमआयमध्ये रूपांतरित करणे. समजा बिल एक लाख रुपयांचे असेल आणि तुम्ही ते भरण्यास असमर्थ असाल, तर तुम्ही ते ईएमआयद्वारे हळूहळू भरू शकता. 7 / 7ईएमआयवर हप्ते भरल्यास ४२% व्याज द्यावे लागणार नाही. ईएमआयवर व्याज दर फक्त १२ टक्के आहे. त्यामुळे ईएमआयचा पर्यायही चांगला ठरू शकतो. शक्यतो क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करताना पुढे किती रक्कम एकाचवेळी भरावी लागेल त्याचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications