शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील पहिली CNG बाईक केव्हा होणार लॉन्च, पाहा काय म्हणाले Bajajचे राजीव बजाज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 10:27 AM

1 / 7
Bajaj Auto CNG Bike : बजाज ऑटो येत्या काही महिन्यांत जगातील पहिली सीएनजी बाइक लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीचे एमडी राजीव बजाज यांनी यावर भाष्य केलं आहे. बजाज ऑटोनं काही दिवसांपूर्वीच सीएनजी बाईक लॉन्च करणार असल्याची घोषणा केली होती. आता त्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
2 / 7
बजाज ऑटो ही भारतातील आघाडीची मोटारसायकल निर्यात करणारी कंपनी पुढील तिमाहीत ही बाईक लॉन्च करणार असल्याची माहिती राजीव बजाज यांनी दिली. CNBC-TV18 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. 'आम्ही प्रत्यक्षात सीएनजी मोटारसायकलचं लाँचिंग पुढील तिमाहीसाठी टाळत आहोत,' असं ते म्हणाले. आम्ही जवळजवळ प्रत्येक पंधरवड्याला उत्पादनं लॉन्च करत आहोत, असंही ते म्हणाले.
3 / 7
इंधन खर्च आणि परिचालन खर्च ५० ते ६५ टक्क्यांनी कमी झाला आहे. आयसीई वाहनांपेक्षा कार्बन उत्सर्जनही कमी होते. सीएनजी प्रोटोटाइपमध्ये कार्बन डायऑक्साइडमध्ये ५० टक्के, कार्बन मोनोऑक्साइडमध्ये ७५ टक्के आणि मिथेन नसलेल्या हायड्रोकार्बन उत्सर्जनात जवळपास ९० टक्के घट झाली असल्याचं त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं.
4 / 7
जे हीरो होंडानं ४० वर्षांपूर्वी केलं होतं, तेच सीएनजी बाईकही करू शकते, असं बजाज म्हणाले. यामुळे ग्राहकांना दुप्पट मायलेज मिळेल आणि इंधनाचा वापरही अर्ध्यावर येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
5 / 7
राजीव बजाज यांनी चेतक ब्रँडच्या इलेक्ट्रिक व्हेरियंटची माहिती देखील शेअर केली, दर महिन्याला विक्रीत ३-५ पट मजबूत वाढ दिसून येत आहे. कंपनीनं पुढील तिमाहीत नवीन चेतक लाँच करण्याची योजना आखली असल्याचं सांगत पुढील तिमाहीपर्यंत दर महिन्याला चेतकचं उत्पादन दुप्पट करत २०००० करण्याचीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
6 / 7
याशिवाय, बजाज ऑटो आर्थिक वर्ष २०२५ च्या सुरुवातीला 'आतापर्यंतची सर्वात मोठी पल्सर' लॉन्च करणार आहे. कंपनीनं सांगितले की त्यांचे लक्ष १२५ सीसी वरील सेगमेंटवर आहे. बजाज ऑटो इलेक्ट्रिक बाइक्सवरही खूप काम करत आहे.
7 / 7
कंपनीनं इलेक्ट्रिक बाईक शेअरिंग प्लॅटफॉर्म Yulu Bikes मधील आपला हिस्सा देखील वाढवला आहे. बजाजनं युलू बाइक्समध्ये ४५.७५ कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक केली आहे. यासह, बजाज ऑटोची युलू बाइक्समधील भागीदारी १८.८ टक्के झाली आहे. बजाज ऑटोने २०१९ मध्ये युलू बाइक्समध्ये सुमारे ६६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती.
टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइल