शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५० हजार असो वा १ लाख सॅलरी, घर खरेदी करताना 'हा' फॉर्म्युला डोक्यात फिट ठेवा, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 2:54 PM

1 / 10
प्रत्येकाचं स्वप्न असतं आपल्या स्वत:चं एक घर असावं, भारतात घराशी भावनिक नाते असते. त्यामुळे नोकरी लागल्यानंतर सर्वात आधी लोक घर खरेदी करतात. विशेषत: मेट्रो शहरात स्वत:चं घर असणं अभिमानाची गोष्ट असते.
2 / 10
अलीकडच्या काळात सहजपणे मिळणाऱ्या घरकर्जामुळे ही घर खरेदी करणे सोप्पे झाले आहे. वाढत्या महागाईत घर खरेदी करायचे की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. भाड्याच्या घरात राहण्यात फायदा आहे का? असाही विचार येतो.
3 / 10
परंतु घर खरेदी करणे आणि भाड्याने राहणे हे दोन्ही तुमच्या मासिक उत्पन्नावर अवलंबून आहे. उत्पन्न आणि खर्च या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ ठेऊन आर्थिक नियोजन करून निर्णय घेतले तर विचार करण्याची गरज भासणार नाही.
4 / 10
सर्वात आधी तुम्हाला घर कधी खरेदी करायला हवं? त्याचे उत्तर घराची किंमत किती आणि तुमची सॅलरी किती आहे त्यात आहे. थेट फॉर्म्युला, घर कर्जाचा मासिक हफ्ता(EMI) हा सॅलरीच्या २०-२५ टक्के असायला हवा. उदा. जर तुमचा मासिक पगार १ लाख रुपये असेल तर तुम्ही २५ हजार EMI सहजपणे भरू शकता.
5 / 10
परंतु तुमचा पगार ५०-७० हजारांच्या मध्ये आहे आणि घरकर्ज घेऊन त्याचा EMI २५ हजार रुपये येत असेल तर तुमचा निर्णय चुकीचा आहे. कारण घरकर्ज फेडण्यासाठी कमीत कमी २० वर्षाचा कालावधी लागतो. अशावेळी तुम्हाला भाड्याच्या घरात राहणे फायदेशीर आहे. जर सॅलरीच्या २५ टक्के रक्कम EMI असेल तर घर खरेदी करू शकता.
6 / 10
सॅलरी ५०-७० हजारांमध्ये असेल आणि घराचा हफ्ता मासिक २० हजार रुपये असेल तर घर खरेदी करू शकता. म्हणजे तुम्हाला २५ लाखांपर्यंत घर खरेदी करता येईल. ज्याला २० वर्षासाठी २० हजार रुपयांहून कमी EMI असेल.
7 / 10
पण घराची किंमत ३० लाख रुपयांहून अधिक आहे तर ५०-७० हजार सॅलरीवाल्यांना घर खरेदी करण्यापेक्षा भाड्याने घेणे फायदेशीर ठरेल. या काळात तुम्ही बचतीवर लक्ष द्या. जेव्हा सॅलरी १ लाखांपर्यंत पोहचेल तर अधिक डाऊन पेमेंट देऊन घर खरेदी करता येईल. जितका डाऊन पेमेंट जास्त तितका EMI कमी होईल.
8 / 10
जर १ लाख पगार असेल तर त्याने ३०-३५ लाखांपर्यंत घर खरेदी करण्याचा निर्णय योग्य राहील. जर सॅलरी दीड लाख रुपये महिना असेल तर त्यांना ५० लाखांपर्यंत घर खरेदी करता येऊ शकते. याचाच अर्थ सॅलरीतील जास्तीत जास्त २५ टक्के रक्कम ही घरकर्जाच्या EMI साठी असावी.
9 / 10
प्रत्येकाला त्यांच्या गरजेनुसार आर्थिक निर्णय घ्यायला हवेत. तुमचा जॉब प्रोफाईल काय? त्यावर निर्णय घ्यावेत. जर तुम्ही सर्वात आधी घर खरेदी केले तर त्याच शहरात तुम्ही बांधलेले जाल. बहुतांश करिअर ग्रोथसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिफ्ट होतात.
10 / 10
पहिल्या नोकरीतून घर खरेदी केले तर दुसरी नोकरी बदलण्याच्या मानसिकतेत राहत नाही. नव्या शहरात जाऊन राहणे, परत घर भाड्याने घेणे, आपल्या स्वत:चे घर भाड्याने देणे हे योग्य वाटत नाही. त्यामुळे जर तुमचा जॉब सुरक्षित नसेल तर घर खरेदी करण्याच्या भानगडीत पडू नका.
टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजन