शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 10:53 AM

1 / 7
देशात सध्या फेस्टिव्ह सीझन (Festive Season 2024) सुरू झाला आहे. या फेस्टिव्ह सीझनच्या सेलमध्ये तुम्हीही शॉपिंग करणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दरम्यान, ऑनलाइन प्लॅटफॉर्मसह, अनेक बँका आपल्या क्रेडिट कार्ड युजर्सना मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील डिस्काउंट मिळविण्याचा पर्याय शोधत असाल, तर काही अशा कार्ड्सबद्दल जाणून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळू शकेल.
2 / 7
एचडीएफसी (HDFC) बँकेच्या व्हिसा कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्डवर (VISA Contactless Credit Card) उत्तम ऑफर सुरू होणार आहेत. ही ऑफर ३० ऑक्टोबर २०२४ पासून HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड्सवर सुरू होईल. या ऑफर अंतर्गत यूजर्सला क्रेडिट कार्ड वापरण्यावर ५ ते १५ टक्के डिस्काउंट मिळू शकतो. शॉपिंग व्यतिरिक्त, मॅड ओव्हर डोनट्स आणि लुकवेल सलूनच्या बिलांवर १५ टक्के सूट मिळत आहे.
3 / 7
कोटक महिंद्रा बँक आपल्या क्रेडिट कार्डच्या (Kotak Mahindra Credit Card) ईएमआयवर डिस्काउंट देत आहे. बँक क्रेडिट कार्डवर १० टक्के ते कमाल ३,००० रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. याचबरोबर, जर युजरने Organic Harvest मधून ४०० रुपयांपेक्षा जास्त खरेदी केली तर त्याला ४० टक्के डिस्काउंट मिळेल. तर सामान्य खरेदीवर १५ टक्क्यांपर्यंत एक्स्ट्रा डिस्काउंट देत आहे. बँक कोटक क्रेडिट ईएमआयवर आठ हजार रुपयांची अतिरिक्त सूट देखील देत आहे.
4 / 7
आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या प्लॅटिनम कार्ड (Platinum Card) युजर्सनाही या सणासुदीच्या मोसमात मोठा लाभ मिळणार आहे. या सणासुदीच्या हंगामात तुम्ही हे कार्ड घेतल्यास, तुम्हाला वार्षिक आणि जॉईनिंग फी भरावी लागणार नाही. त्याचबरोबर इंधन अधिभारावरही सवलत क्रेडिट कार्डद्वारे मिळणार आहे. बँक या सणासुदीच्या हंगामात आपल्या युजर्सना रिवॉर्ड आणि व्हाउचर देखील देत आहे.
5 / 7
अॅक्सिस बँक (Axis Bank) आपल्या क्रेडिट कार्डवर (Axis Credit Card) २५ सप्टेंबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत ऑफर देत आहे. युजर्सना मॅक्स फॅशनमधून खरेदीवर ५ टक्के डिस्काउंट मिळेल. तसेच, जर युजर्स क्रेडिट कार्डद्वारे आयफोन खरेदी करत असतील, तर त्यांना ८ हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.
6 / 7
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या सणासुदीच्या हंगामात आपल्या युजर्सना सवलतीचा लाभ देत आहे. एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे (SBI Credit Card) स्विगीवर ऑर्डर केल्यास युजर्सला १०० रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच, बँक Ather वर ७.५ टक्के आणि Blackberrys वर ५ टक्के डिस्काउंट देत आहे.
7 / 7
आयडीबीआय बँक क्रेडिट कार्डद्वारे (IDBI Credit Card) युजर्स Swiggy Instamart आणि Swiggy Food वर २० टक्के ते १५० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात. तसेच, BookMyShow वर २५ टक्के सूट उपलब्ध आहे. याशिवाय, PVR, INOX वर तिकीट बुकिंग केल्याल २५ टक्के सूट मिळू शकते.
टॅग्स :bankबँकbusinessव्यवसाय