'या' देशांत मिळतं भारतापेक्षा स्वस्त सोने? स्वतःसोबत किती आणू शकतो? काय सांगतो कायदा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 12:57 IST
1 / 7गेल्या एकदोन वर्षात सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. ही वाढ अशीच सुरू राहिली तर सोने एक लाखांच्या पार गेले तर आश्चर्य वाटायला नको. पण, अजूनही काही देश असे आहेत, जिथे भारतापेक्षा स्वस्तात सोने मिळते. या देशातून तुम्ही कायदेशीररित्या सोने आणू शकता.2 / 7दुबईला सोन्याचे शहर म्हटले जाते. कारण येथे सोन्यावर व्हॅट किंवा आयात शुल्क नाही. त्यामुळे दुबईच्या सोन्याच्या बाजारात सोन्याचे भाव भारताच्या तुलनेत कमी आहेत.3 / 7दुबईनंतर सिंगापूरचे नाव येते, जे सोन्याच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. जेथे कमी कर आणि उच्च दर्जाचे सोने उपलब्ध आहे.4 / 7बँकॉकची सोन्याची बाजारपेठ सोन्याच्या चांगल्या किमतींसाठी प्रसिद्ध आहे. येथील सोन्याच्या किमती भारताच्या तुलनेत कमी असून त्याची शुद्धताही चांगली आहे.5 / 7स्वित्झर्लंड सोन्याचे शुद्धीकरण आणि साठवणुकीसाठी ओळखला जातो. येथे सोन्याची शुद्धता चांगली असून किमती तुलनेने कमी आहेत. याशिवाय हाँगकाँगमध्ये करमुक्तीमुळे सोन्याची किंमत खूपच कमी आहे.6 / 7तुम्ही देखील परदेशातून सोने खरेदी करून भारतात आणू शकतात. यासाठी सरकारने केलेले काही नियम पाळणे आवश्यक आहे. तुम्ही कोणताही आयात कर न लावता २० ग्रॅम सोने सोबत आणू शकतो.7 / 7तर एक महिला प्रवासी ४० ग्रॅम सोने आयात कर न देता सोबत आणू शकते. भारतात सोने केवळ दागिन्यांच्या स्वरूपात आणले जाऊ शकते, बार आणि नाण्यांवर बंदी आहे. तसेच, सोने खरेदीचे बिल तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.