शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील 'या' 5 देशांत मिळतं सर्वात स्वस्त सोनं, भारतापेक्षाही आहे कमी किंमत, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 1:29 PM

1 / 10
दुबईचे नाव ऐकल्यानंतर अनेक लोक येथील सोन्याच्या खरेदीबाबत बोलत असतात. दुबईमध्ये दिएरा नावाचे एक ठिकाण आहे, जिथे गोल्ड सॉक एरिया सोने खरेदीचे केंद्रस्थान मानले जाते. भारतापेक्षा जवळपास १५ टक्के स्वस्त दराने सोने मिळते.
2 / 10
या व्यतिरिक्त दुबईमध्ये तुम्ही जोयलुकास, गोल्ड अँड डायमंड पार्क आणि मलबार गोल्ड अशा काही बाजारपेठा आहेत. याठिकाणी तुम्ही सहजपणे कमी किंमतीत सोने खरेदी करू शकता.
3 / 10
थायलंडमधील बँकॉक हे देखील लोक कमी किंमतीत सोने खरेदी करण्यासाठी सर्वात पसंत करतात. येथे कमी मार्जिनमध्ये सोने मिळते. यासह, व्हरायटी देखील खूप चांगल्या आहेत.
4 / 10
बँकॉकमधील चायना टाउनमधील यावोरात रोड सोने खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी तुम्हाला मोठ्या संख्येने सोन्याची दुकाने आढळतील.
5 / 10
हाँगकाँग जगभरात आपल्या शॉपिंग हबसाठी ओळखले जाते. मात्र याठिकाणी सोने सुद्धा अगदी कमी किंमतीत मिळते.
6 / 10
हाँगकाँग जगातील सर्वात सक्रिय सोन्याच्या व्यापारातील बाजारपेठ आहे. याशिवाय येथील सोन्याच्या डिझाईन्स जगभरात प्रसिद्ध आहेत.
7 / 10
स्वित्झर्लंड जगभरातील डिझायनर घड्याळांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, सोन्याचा व्यापारही येथे चांगला केला जातो. येथील झुरिक शहर सोन्याच्या बाजारपेठेसाठी ओळखले जाते.
8 / 10
स्वित्झर्लंडमध्ये तुम्हाला हस्तनिर्मित डिझाइनर दागिने मिळतील. येथे काम करणारे कारागीर पिढ्यानपिढ्या हा व्यवसायात करत आहेत.
9 / 10
भारतातील केरळ राज्यातही स्वस्त दरात सोने मिळते. केरळमधील कोचीन शहरात तुम्हाला मलबार गोल्ड, भीमा ज्वेलर्स, जोयलुकास यासारख्या ठिकाणाहून कमी किंमतीत सोनं खरेदी करण्याची संधी मिळू शकते.
10 / 10
केरळमध्ये दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीनिमित्त इथल्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. येथे नवीन दागिन्यांपेक्षा जुन्या सोन्याचे दागिने बदलण्याचा सर्वधिक ट्रेंड आहे.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयGoldसोनंDubaiदुबईSwitzerlandस्वित्झर्लंडKeralaकेरळ