शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कॅन्सरशी लढताना सूचली कल्पना, झाली कमाल; आता १० प्रायव्हेट जेटच्या मालक आहेत 'या' बिझनेसवुमन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 8:53 AM

1 / 7
असं म्हणतात की एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द असेल तर ती मेहनत आणि धाडसानं मिळवता येते. याचं उदाहरण म्हणजे ३३ वर्षीय भारतीय उद्योगपती कनिका टेकरीवाल. त्यांनी तरुण वयातच कॅन्सरसारख्या घातक आजाराविरुद्धची लढाई जिंकली, इतकंच नाही तर, आपल्या व्यवसायाच्या कल्पनेच्या जोरावर कोट्यवधींची संपत्तीही कमावली. कनिका यांनी सुरू केलेलं JetSetGo या स्टार्टअपला मोठं यश मिळालंय.
2 / 7
कनिका या विमान भाडेतत्वावर देणारी कंपनी JetSetGo च्या संस्थापक आहेत. विमान भाड्यानं देणारी ही भारतातील पहिली कंपनी आहे. कॅन्सरशी लढा आणि तो जिंकण्यापासून ते कोट्यवधींचं साम्राज्य उभारण्यापर्यंतची त्याची कहाणी खूप रंजक आहे. यातून त्यांची जिद्दही दिसून येते.
3 / 7
कनिका यांनी २०१२ मध्ये हा गेम बदलणारा स्टार्टअप स्थापन केला होता. कॅन्सरशी झुंज देत असताना त्यांना ही कल्पना सुचली आणि इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी या आजाराविरुद्धची लढाई तर जिंकलीच, शिवाय आपली कंपनी सुरू करून तिला नव्या उंचीवर नेलं.
4 / 7
उद्योगपती कनिका टेकरीवाल यांचा जन्म ७ जून १९९० रोजी झाला आणि आता त्या ३३ वर्षांच्या आहेत. रिपोर्टनुसार, या वयातच कनिका टेकरीवाल जवळपास ४२० कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सामील झाल्या आहे. त्यांचं स्टार्टअप JetSetGo हे चार्टर्ड विमानं आणि हेलिकॉप्टर भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणारे अग्रगण्य एअरक्राफ्ट एग्रीगेटर म्हणून प्रसिद्ध आहे. आतापर्यंत या कंपनीनं अंदाजे १,००,००० प्रवाशांसाठी ६,००० यशस्वी उड्डाणं केली.
5 / 7
जेव्हा कनिका यांनी जेटसेटगो सुरू करण्याचा विचार केला, तेव्हा त्यांनी सर्वात आधी तिच्या वडिलांना विमानं आणि हेलिकॉप्टर भाड्यानं घेण्याच्या व्यवसायाबद्दल सांगितलं. मात्र, त्यांना ते फारसे आवडलं नाही.
6 / 7
असं असतानाही कनिका यांनी आपली जिद्द कायम ठेवली आणि विमान वाहतूक क्षेत्रातील गुंतागुंत जाणून घेतल्यानंतर ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रवास सुरू केला. आज कनिका यांची स्वतःची १० खाजगी विमानं आहेत. त्यांनी हैद्राबादमधील एका मोठ्या व्यवसायिकाशी विवाह केला असून त्या यशस्वीरित्या आपल्या व्यवसाय चालवत आहेत.
7 / 7
भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक कनिका टेकरीवाल यांना हुरुन रिच लिस्टमध्ये देशातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिलांपैकी एक म्हणून स्थान देण्यात आलं आहे. वृत्तानुसार, त्यांना भारत सरकारचा राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कारही मिळाला आहे. याव्यतिरिक्त, त्यांना एंटरप्रेन्योर मासिकानं 'द स्काय क्वीन' या मानानं सन्मानित केलंय.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी