शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

GDP घटत असतानाच सेंसेक्स ५० हजारांवर; ही आहेत कारणे, गुंतवणुकीबाबत तज्ज्ञ म्हणतात...

By बाळकृष्ण परब | Published: January 21, 2021 11:14 PM

1 / 9
एकीकडे कोरोना, लॉकडाऊनमुळे देशाचा जीडीपी उणे झाला असताना गेल्या काही महिन्यांत सेंसेक्सने प्रचंड मुसंडी मारली आहे. आज सेंसेक्स ५० हजारांच्या वर गेला आहे. सेंसेक्सने हे शिखर देशाचा जीडीपी पहिल्या तिमाहीत २३.९ आणि दुसऱ्या तिमाहीत ७.५ टक्क्यांनी घटला असताना गाठले आहे.
2 / 9
देशात कोपोनाच्या संकटाला सुरुवात झाल्यावर सेंसेक्समध्ये मोठी घट झाली होती. २३ मार्च २०२० रोजी सेंसेक्स ३ हजार ९३४.७२ अंकांनी कोसळला होता. त्यामुळे त्यावेळी सेंसेक्स हा २६ हजारांच्या खाली होता.
3 / 9
त्यावेळी मार्च-एप्रिलमध्ये पुढच्या दहा महिन्यांत सेंसेक्स पन्नास हजारांचा टप्पा पार करेल अशी कुणी अपेक्षाही केली नव्हती. कोरोनाच्या संकटात शेअर बाजार कोसळत असल्याने गुंतवणुकदार गांगरेलेले होते. मात्र मार्चनंतर शेअर बाजारात तेजी कोणत्या कारणामुळे आलीय हे त्यांना कळत नव्हते.
4 / 9
मात्र अनेक शंका-कुशंका व्यक्त होत असताना शेअर बाजाराने मात्र मागे वळून पाहिले नाही. नोव्हेंबर २०२ नंतर तर सेंसेक्स सुसाट वाढत सुटला. त्यामुळे २०२१ मध्ये सेंसेक्स ५० हजारांचा आकडा पार करेल, असे तज्ज्ञ सांगू लागले. मात्र जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेअर बाजाराने ५० हजारांचा टप्पा पार केला.
5 / 9
कोरोनाकाळात जगभरातील इतर विकसनशील देशांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजाराची स्थिती चांगली दिसत आहे. या तेजीमुळे भारतातील सूचिबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप देशाच्या सकल घरेलू उत्पन्नापेक्षा अधिक झाले आहे.
6 / 9
गेल्या २ महिन्यांत शेअर बाजारामध्ये आलेल्या या तेजीमागे परकीय गुंतवणूकदारांचा मोठा वाटा आहे. २०२०-२१ च्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत परकीय गुंतवणूकदारांनी रेकॉर्डब्रेक गुंतवणूक केली. ही गुंतवणूक आजही सुरू राहिली. आतापर्यंत जानेवारी महिन्यात परकीय गुंतवणूकदारांनी २.६ अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक केली आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारांवर दिसून येत आहे.
7 / 9
कोरोनावर आलेली लस आणि भारतात सुरू झालेली कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात ही सुद्धा शेअर बाजारातील तेजीची कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे.
8 / 9
सेंसेक्सने १९९० मध्ये पहिल्यांदा एक हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर १९९९ मध्ये पाच हजार, २००६ मध्ये १० हजार, २०१३ मध्ये २० हजार, २०१७ मध्ये ३० हजार २०१९ मध्ये ४० हजार आणि आता २०२१ मध्ये पन्नास हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
9 / 9
गेल्या २० वर्षांमधील शेअर बाजाराच्या प्रवासाचा पॅटर्न पाहिल्यास सेंसेक्स प्रत्येक सहा ते सात वर्षांमध्ये दुप्पटीने वाढला आहे. १९९९-२००० मध्ये सेंसेक्स सहा हजार होता. तर तो २००६ मध्ये १० हजारांवर गेला. २०१३ मध्ये २० हजार तर २०१९ मध्ये ४० हजार झाला आहे.
टॅग्स :Sensexनिर्देशांकStock Marketशेअर बाजारbusinessव्यवसाय