Who can save tax in what ways? Read more...
कोण-कोणत्या मार्गांनी करू शकता करबचत? वाचा सविस्तर... By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 8:09 AM1 / 6करदात्यांनी पात्र करबचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास आयकर कायद्यांतर्गत विविध प्रकारच्या कर सवलती मिळतात. करदात्याने कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केलेली नसली तरी ते करांमधून सवलतीची मागणी करू शकतात. तुम्ही कोणकोणत्या मार्गांनी जास्तीत जास्त करबचत करू शकता याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.2 / 6भाड्याच्या घरात राहणारे कर्मचारीही आयकर कायद्यातर्गत एचआरए भत्त्यात सवलतीची मागणी करून करबचत करू शकतात. एचआरए भत्त्यावर कलम १० अंतर्गत तरतुदीनुसार सवलत मिळते.3 / 6गुंतवणुकीशिवाय करात बचत करण्याची आणखी एक कल्पना म्हणजे शैक्षणिक कर्जावर दिलेल्या व्याजातून वजावटीचा दावा करणे. कलम ८०ई द्वारे वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या शैक्षणिक कर्जावर प्रदान केलेल्या व्याजाच्या वजावटीची परवानगी दिली जाते. तुम्ही सकल एकूण उत्पन्नावर वजावटीचा दावा करून करप्राप्त उत्पन्न वजा करू शकता. वजावटीची परवानगी दिलेले शैक्षणिक कर्ज स्वतः चे शिक्षण, जोडीदाराचे, मुलांचे किंवा तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचे कायदेशीर पालक आहात त्याच्या शिक्षणासाठी घेता येईल.4 / 6प्राप्तिकर कायद्यान्वये घरगुती मालमत्ता खरेदी/ बाधकामासाठी प्राप्तिकर कायद्याच्या कलम २४ (बी) अंतर्गत वजावटीला परवानगी दिली जाऊ शकते. स्वतःच्या ताब्यात असलेल्या निवासी मालमत्तेसाठी कर्जाची मूळ रक्कम आणि त्यावरील व्याजावर वेगवेगळ्या तरतुदी अंतर्गत वजावटीला परवानगी आहे.5 / 6कलम ८०डी अंतर्गत स्वतःसाठी आणि कुटूंबातील सदस्यांसाठी आरोग्य विमा काढला असेल तर सवलत मिळते. तुम्ही स्वतः, जोडीदार किंवा अवलंबून असलेल्या मुलांसाठी आरोग्य विमा हप्ता भरला असल्यास तुम्ही २५ हजार रुपयांची वजावट करू शकता. वय वर्षे ६० वरील पालकासाठी प्रदान केलेल्या वैद्यकीय विम्याच्या हप्त्यासाठी आणखी २५ हजार रुपयांपर्यंत वजावटीची परवानगी आहे. ही वजावट कोरोना- कवचसारख्या कोविडशी संबंधित आरोग्यविमा पॉलिसीच्या खरेदीसाठीही लागू आहे. 6 / 6मुलांच्या शिक्षणासाठी (चालक भत्ता) तसेच वसतिगृहाचा खर्च (वसतिगृह भत्ता) जो कंपनीकडून कर्मचाऱ्याना दिला गेला असेल तर कोणताही भत्ता (नियत मर्यादिपर्यंत) कलम १० अंतर्गत वजावटीसाठी पात्र आहे. ही वजावट मुलाच्या शैक्षणिक भत्त्यासाठी वार्षिक पातळीवर १.२०० रुपयापर्यंत आणि वसतिगृहाच्या खर्चाच्या भत्त्वासाठी वार्षिक पातळीवर ३.६०० रुपयांपर्यंत मर्यादित आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications