शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Hindenburg Report : Hindenburg मध्ये नाव आलेले SEBI प्रमुखांचे पती धवल बुच कोण, का माधबी बुच यांच्यासोबत आले निशाण्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 8:39 AM

1 / 9
हिंडेनबर्ग रिसर्च’नं केलेल्या दाव्यांत ‘सेबी’च्या अध्यक्ष माधबी पुरी बुच व त्यांचे पती धवल यांच्यावर आरोप केले आहेत. मात्र, बुच यांनी हे आरोप निराधार आणि चारित्र्यहनन करणारे असल्याचं म्हटलंय.
2 / 9
तर, बुच यांनी वेळोवेळी संबंधित माहिती दिलेली असून संभाव्य हितसंबंधांचा मुद्दा विचारात घेऊन अशा प्रकरणांपासून त्यांनी स्वत:ला वेगळं ठेवलं, असं ‘सेबी’नं स्पष्ट केलंय. अदानी समूहानंही सर्व दावे खोडून काढले आहेत.
3 / 9
हिंडेनबर्ग रिसर्चनं गेल्या वर्षी अदानी समूहावर फसवणुकीचा आणि शेअर बाजारातील हेराफेरीचा आरोप केला होता. या रिपोर्टनंतर अदानी समूहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. हिंडेनबर्गनं आपल्या ताज्या रिपोर्टमध्ये माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावरही निशाणा साधलाय. चला तर मग जाणून घेऊया सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांचे पती धवल बुच आहेत तरी कोण?
4 / 9
माधबी पुरी बुच यांचे पती धवल बुच हे अनुभवी व्यावसायिक आहेत. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, धवल बुच सध्या ब्लॅकस्टोन आणि अल्वारेझ अँड मार्सलमध्ये वरिष्ठ सल्लागार आहेत. ते गिल्डनच्या संचालक मंडळावर नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणूनही काम करतात. अलीकडेच ते ब्रिसालकॉनचे सीईओ आणि महिंद्रा समूहाचे हंगामी अध्यक्ष (ग्रुप टेक्नॉलॉजी) होते.
5 / 9
सध्याच्या भूमिकेपूर्वी धवल बुच यांनी युनिलिव्हरसोबत तीन दशकांपर्यंत कार्यरत होते. कंपनीत खरेदी आणि पुरवठा चेनेचे सर्व पैलू त्यांनी हाताळले. युनिलिव्हरमध्ये त्यांची भूमिका मुख्य खरेदी अधिकारी म्हणून होती. याआधी सिंगापूरपासून आशिया/आफ्रिका क्षेत्रासाठी युनिलिव्हर सप्लाय चेन त्यांनी पाहिली होती.
6 / 9
ए अँड एमच्या अधिकृत वेबसाइटवरील प्रोफाइलनुसार, धवल बुच यांनी युनिलिव्हरमधील त्यांच्या मागील भूमिकेदरम्यान जागतिक स्तरावर रसायनं, पॅकेजिंग सामग्री, अन्न घटक आणि इतर सेवांमध्ये ४२ अब्ज डॉलर्सची जबाबदारी पार पाडली होती.
7 / 9
प्रोफाईलमध्ये असंही म्हटलंय की बुच यांनी १२० फॅक्टरी आणि १०० डिस्ट्ररिब्युशन सेंटरमध्ये उत्पादन आणि लॉजिस्टिक ऑपरेशनचं नेतृत्व केलंय. पाच दशलक्ष टन ब्रँडेड उत्पादनांचे उत्पादन आणि संचालन केले, तसंच जागतिक ग्लोबल सप्लाय चेन राबविण्याची जबाबदारी देखील होती. आशिया, आफ्रिका आणि रशियामधील युनिलिव्हरबरोबर २० हून अधिक देशांमध्ये ब्रँडेड उत्पादनांमध्ये २२० दशलक्ष डॉलर्सची निर्यात करण्यासाठी काम केलं. धवल बुच हे दिल्लीच्या आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. १९८४ मध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली.
8 / 9
हिंडेनबर्गनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात बुच दाम्पत्य तसेच सेबीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर सेबीनं उत्तर दिले असून याप्रकरणी २६ पैकी एक मुद्दा वगळता सर्व मुद्द्यांवर तपास पूर्ण झालेला आहे. १२ हजार पानांची ३०० हून अधिक कागदपत्रे तपासण्यात आली आहेत.
9 / 9
माधबी आणि त्यांचे पती धवल यांनी बर्म्युडा आणि मॉरिशसमध्ये ऑफशोअर फंडांमध्ये अघोषित गुंतवणूक केली होती. हे तेच फंड आहेत ज्यांचा वापर विनोद अदानी यांनी निधीचा अपहार करण्यासाठी आणि अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढवण्यासाठी केला होता, असा आरोप हिंडेनबर्गनं केला होता. विनोद अदानी हे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे मोठे बंधू आहेत.
टॅग्स :SEBIसेबीAdaniअदानीGautam Adaniगौतम अदानी