शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोण आहे मानसी? रतन टाटांशी आहे खास नातं; या मराठमोळ्या मुलीवर टोयोटाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 4:04 PM

1 / 10
मानसी किर्लोस्कर-टाटा ही युवती १३० वर्ष जुन्या किर्लोस्कर ग्रुपच्या किर्लोस्कर जाँईट वेंचर प्रायव्हेट लिमिटेडची चेअरमन बनली आहे. ही जबाबदारी मागील वर्षी तिचे वडील विक्रम किर्लोस्कर यांच्या नोव्हेंबर २०२२ मधील निधनानंतर देण्यात आली होती.
2 / 10
मानसी किर्लोस्टर टाटा यांना जाँईट वेंचर बोर्डाच्या चेअरमनपदी नियुक्ती केली. त्यांच्या निवडीनंतर टोयोटा मॅटिरियल हँडलिंग इंडिय प्रायव्हेट लिमिटेड(TMHIM) आणि डेनो किर्लोस्कर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडची कमान हाती देण्यात आली.
3 / 10
मानसी किर्लोस्कर टाटा या टोयोटाच्या किर्लोस्कर मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बोर्डमध्ये होत्या. परंतु वडिलांच्या निधनानंतर त्यांची नियुक्ती चेअरमनपदावर करण्यात आली. किर्लोस्कर कंपनीचे टोयोटासोबत जाँईट वेंचर आहे. त्यामुळे फॉर्च्युनर आणि इनोव्हासारख्या गाड्या भारतात येऊ शकल्या.
4 / 10
ही कंपनी भारतात टोयोटा मॅन्युफॅक्चरिंग आणि विक्री युनिट पाहते. आता या कंपनीची कमान मानसी किर्लोस्कर टाटा या महिलेच्या हाती आहे. ३२ वर्षीय मानसीने अमेरिकेच्या आयलँड स्कूल ऑफ डिझाईनमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे.
5 / 10
शिक्षणानंतर मानसी वडिलांसोबत कंपनीत काम करत होती. २०१९ मध्ये तिचे लग्न नेविल टाटा यांच्यासोबत झाले. नेविल टाटाचे वडील नोएल टाटा जे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. टाटा कुटुंबाची सून आणि किर्लोस्करांची लेक असूनही मानसी माध्यमापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते.
6 / 10
विक्रम किर्लोस्कर यांना भारतात टोयोटा कार कंपनी आणण्याचे श्रेय जाते. त्यांनी १९९७ मध्ये टोयोटासोबत भागीदारी केली. त्यांच्या जाँईट वेंचरमध्ये ११ टक्के भागीदारी किर्लोस्कर समुहाची आहे. विक्रम किर्लोस्कर यांचे आजोबा एसएल किर्लोस्कर यांनी कंपनीची स्थापना केली होती.
7 / 10
मानसीचा विवाह अत्यंत साध्यापद्धतीने पार पडला. या लग्नाला फार मोजके लोकच उपस्थित होते. मानसी किर्लोस्कर टाटा या केअरिंग विथ कलर नावाचा एक NGO देखील चालवतात. त्यंना पेंटिंग शिवाय, स्विमिंगचाही छंद आहे.
8 / 10
किर्लोस्कर ग्रुपच्या अन्य कंपन्यांही आहेत. विक्रम किर्लोस्कर यांचे निध २९ नोव्हेंबर २०२२ मध्ये झाले होते. त्यावेळी ते टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे वाइस चेअरमन होते. त्या ग्रुपचे चेअरमनपद आता मानसी किर्लोस्कर टाटा यांच्याकडे आहे.
9 / 10
मानसी किर्लोस्कर टाटा यांच्याकडे ऑटोमार्केट सेक्टरच्या भविष्याचा अंदाज लावून योग्यरित्या गुंतवणूक करण्याचा अनुभव आहे. मानसीचे फोकस एसयूवीसह टोयोटाची हायब्रिड आणि इलेक्ट्रिक कार भारतात आणण्याचे ध्येय आहे.
10 / 10
मानसी किर्लोस्कर टाटा या चांगल्या चित्रकारही आहेत. वयाच्या १३ व्या वर्षी मानसी यांनी स्वत:च्या पेटिंगचे प्रदर्शन भरवलं होते. बंगळुरूमध्ये सोलो पेटिंग एक्झिबिहॅशन आयोजित केले होते. त्यात एमएफ हुसेनही आले होते. मानसी यांना पेटिंगसोबत स्विमिंगचीही आवड आहे.
टॅग्स :Ratan Tataरतन टाटाAutomobileवाहन