शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?

By जयदीप दाभोळकर | Published: October 11, 2024 8:52 AM

1 / 8
Who Is Maya TATA : देशातील ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचं मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात बुधवारी रात्री निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. टाटा या नाममुद्रेला जागतिक स्तरावर नेणारे, शालीन, सुसंस्कृत, द्रष्टे उद्योजक, प्राणिमात्रांवर पराकोटीचे प्रेम करणारे, नवउद्यमींना मदतीचा हात देणारे, राजस आणि लोभस व्यक्तिमत्त्व लाभलेले रतन टाटा यांच्यावर गुरुवारी वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
2 / 8
३४ वर्षीय माया टाटा रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा आणि अलू मिस्त्री यांच्या कन्या आहेत. अलू या अब्जाधीश पालोनजी मिस्त्री यांच्या कन्या आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या बहीण आहे.
3 / 8
सायरस यांच्या एका कार अपघातात मृत्यू झाला होता. मिस्त्री कुटुंबाचा सायरस इंव्हेस्टमेंट्स प्रायव्हेट आणि स्टर्लिंग इंव्हेस्टमेंट ग्रुपच्या माध्यमानं टाटा सन्समध्ये जवळपास १८.४ टक्के हिस्सा आहे. अशा प्रकारे माया यांचं टाटांसोबत दुहेरी नातं तर आहेच. शिवाय, यामुळेच येणाऱ्या काळात इतक्या मोठ्या साम्राज्याच्या वारसदार म्हणून त्यांच नाव असण्याचा अंदाज बांधला जात आहे. उत्तराधिकारी म्हणून त्यांचं नाव का अग्रेसर आहे, जाणून घेऊया.
4 / 8
माया टाटा या ३४ वर्षांच्या आहेत. लिआ आणि नेव्हिल या भावंडांसह माया टाटा समूहातील प्रमुख संस्था टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या संचालक मंडळावर कार्यरतदेखील आहेत. माया टाटा यांनी ब्रिटनमधील बायस बिझनेस स्कूल आणि वॉरविक युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलंय. टाटा कॅपिटलची उपकंपनी असलेल्या टाटा अपॉर्च्युनिटीज फंडात रुजू होऊन त्यांनी व्यवसाय क्षेत्रात प्रवेश केला.
5 / 8
टाटा अपॉर्च्युनिटीज फंड बंद झाल्यानंतर माया टाटा समूहाची उपकंपनी असलेल्या टाटा डिजिटलमध्ये रुजू झाल्या. माया टाटा यांनी टाटा डिजिटलसोबत भागीदारी केली आणि टाटा नवीन अॅप लाँच केलं.
6 / 8
माया टाटा यांनी टाटा समूहातील अनेक कंपन्यांमध्ये विविध पातळ्यांवर काम केले असून टाटा ट्रस्टमध्येही सक्रिय भूमिका बजावताना दिसल्या आहेत. माया टाटा यांना समाजसेवा आणि विकासात रस असून त्या टाटा ट्रस्टच्या सामाजिक योगदानाच्या कार्यात सक्रिय आहेत. कौटुंबिक व्यवसायाशी निगडित असूनही माया या साधं जीवन जगताहेत.
7 / 8
इतके दिवस टाटा समूहाशी संबंधित राहिल्यानंतर माया टाटा यांना व्यवसायाबद्दल बरीच कल्पना आहे. यासोबतच त्यांनी रतन टाटा यांच्याकडून बिझनेस स्किल्सही शिकल्या आहेत. अशा तऱ्हेनं आता त्यांच्यावर टाटा ट्रस्टची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.
8 / 8
सध्या टाटा समूहाचे प्रमुख एन. चंद्रशेखर आहेत. पण निधनापूर्वी रतन टाटा हे टाटा ट्रस्टचे चेअरमन होते. त्यांनी आपला उत्तराधिकारी जाहीर केला नाही. आता माया टाटा यांच्यावर ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रतन टाटा यांची एकूण संपत्ती ३,८०० कोटी रुपये आहे.
टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटाbusinessव्यवसाय