शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगभरातील शेअर बाजारातील घसरणीला जबाबदार कोण? यात त्यांचा फायदा काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 3:06 PM

1 / 8
गेल्या एक महिन्यापासून शेअर मार्केट तेजीत होता, अमेरिकी शेअर मार्केटही ऑल टाईम हाय लेवलवर होता. यामुळे जगभरातील शेअर मार्केटही तेजीत सुरू होता. पण, आज सकाळी जगभरातील शेअर कोसळल्याची बातमी समोर आली आहे. जगभरातील शेअर बाजार कोसळण्याचे मुख्य कारण अमेरिका असल्याचे बोलले जात आहे.
2 / 8
जगभरातील शेअर मार्केटला हादरा देणारे अमेरिकेतील उद्योगपती आहेत. ते म्हणजे बर्कशायर हॅथवेचे चेअरपर्सन वॉरेन बफे. जगभरात त्यांना गुंतवणुकीतील बादशाह म्हणून ओळख आहे. त्यांच्या एवढा पैसा कुणीही कमावला नसल्याचं बोललं जातं.
3 / 8
वॉरेन बफे यांच्याकडे सुमारे २७७ अब्ज डॉलर्सची रोकड आहे. बफे यांची Apple, अमेरिकन एक्स्प्रेस आणि बँक ऑफ अमेरिकामध्येही होल्डिंग आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या रोकडमुळे ते सर्वात मोठ्या कंपनीचे शेअर्स वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात.
4 / 8
गेल्या काही दिवसापूर्वी वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवेने अॅपल कंपनीसह अन्य दिग्गज कंपनीतील हिस्सेदारी विकल्याचे समोर आले होते. एवढी हिस्सेदारी विकण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती.
5 / 8
यानंतर त्यांनी कुठेच गुंतवणूक केली नव्हती. त्यांच्याकडून सांगण्यात आले होते की, जास्त नफा जेव्हा दिसेल तेव्हाच गुंतवणूक करणार.
6 / 8
वॉरेन बफे यांनी हिस्सेदारी काढून घेतल्यानंतर जगभरातील शेअर बाजारावर परिणाम होण्यास सुरुवात झाली होती, अनेक अफवाही पसरल्या होत्या.
7 / 8
जगभरातील गुंतवणूकदारांना असे वाटले की, बफे यांना काहीतरी माहित झाले आहे, ज्या गोष्टी आपल्याला अजूनही माहिती नाहीत. यामुळेच अमेरिका तसेच चीन, जपान आणि भारतासारख्या सर्व मोठ्या मार्केटमध्ये विक्री झाली त्यामुळे शेअर मार्केट कोसलळा.
8 / 8
वॉरेन बफे यांच्याकडे २७७ बिलियन एवढी रक्कम तर आहेच, यासह त्यांच्याकडे अनेक कंपन्यांमधील हिस्सेदारीही आहे. याचा अर्थ आता मंदी आली नसती तरी त्यांना अॅपल, बँक ऑफ अमेरिका इथून मोठा नफा मिळालाच असता. पण, आता जगभरातील शेअर मार्केट कोसळल्याने ते पुन्हा बाजारात गुंतवणूक करुन मोठा नफा मिळवू शकतात.
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजार