शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अर्थमंत्र्यांसोबत ही मिस्ट्री गर्ल कोण? जगातील सर्वात मोठ्या शक्तीवर गाजवते अधिराज्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 2:53 PM

1 / 8
अवघे जग मंदीच्या छायेत असताना भारत असा देश आहे जिथे महागाई तर आहे, पण मंदीची आशंका दिसत नाहीय.
2 / 8
अशावेळी भारतात एक महत्वाची जी २० देशांची परिषद होत आहे. पहिला जो फोटो तुम्ही पाहिलाय त्यात आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. पण त्यांच्यासोबत जी दिसतेय ती महिला कोण? मिस्ट्री गर्ल...
3 / 8
ही एवढी शक्तीशाली महिला आहे की जागतीक अर्थकारणावर ती अधिराज्य गाजवतेय. जगभरातील देशांना अर्थ पुरवठा करणारी, मदत करणारी संस्था आयएमएफ जिचे नाव तुम्ही पाकिस्तानला मदत नाकारल्यामुळे नुकतेच ऐकले असेल अशा संस्थेवर उपव्यवस्थापकीय संचालक आहे.
4 / 8
नाव आहे गीता गोपीनाथ, एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. गीता या बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या जी २० परिषदेत सहभागी होण्यासाठी आल्या आहेत.
5 / 8
या परिषदेच महिलांची साडी पावर पहायला मिळाली. भारताच्या अध्यक्षतेखाली G20 अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर (FMCBG) यांची पहिली बैठक बेंगळुरू येथे सुरू आहे. यात सहभागी होण्यासाठी आलेल्या परदेशी महिला अधिकाऱ्यांना साडी फारच आवडली आहे.
6 / 8
'G20 फायनान्स ट्रेक' चा भाग म्हणून FMCBG बैठक आयोजित केली जात आहे. यंदा G20 चे अध्यक्षपद भारताकडे आहे.
7 / 8
गीता गोपीनाथ यांचा जन्म 8 डिसेंबर 1971 रोजी कोलकातामध्ये एका मल्याळी कुटुंबात झाला.
8 / 8
1992 मध्ये गोपीनाथ यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात बीए पदवी मिळवली. 1994 मध्ये तिने दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पहिली पदव्युत्तर पदवी मिळवली. 1996 मध्ये तिने वॉशिंग्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात दुसरी पदव्युत्तर पदवी मिळवली.
टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन