शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अखेरच्या क्षणी ना पत्नी सोबत होती ना...कुटुंब! सुब्रत रॉय किती संपत्ती सोडून गेले पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 16:30 IST

1 / 7
लोकांना श्रीमंत बनण्याचं स्वप्न दाखवणारे आणि बचतीचे धडे देणारे सुब्रत रॉय सहारा यांचं निधन झालं. ते दीर्घकाळ आजाराशी झुंज देत होते. अखेर मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण शेवटच्या क्षणी त्यांच्याजवळ कुणीच नव्हतं. गेल्या दोन महिन्यांपासून उपचारासाठी ते मुंबईतील रुग्णालयात दाखल होते. त्यांची पत्नी आणि दोन मुलं सुशांतो व सीमांतो परदेशात स्थायिक आहेत.
2 / 7
सुत्रांच्या माहितीनुसार सुब्रत रॉय सहारा यांचं कुटुंब मेसेडोनियामध्ये स्थायिक आहेत. त्यांनी तिथलं नागरिकत्व स्वीकारलं आहे. सहारा यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीचा 'सहारा' कोण? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. सुब्रत यांच्यानंतर त्यांच्या व्यवसायाचा डोलारा कोण सांभाळणार?
3 / 7
सुब्रत रॉय सहारा यांची गणना देशातील बड्या उद्योगपतींमध्ये होत होती. त्यांनी जवळपास प्रत्येक सेक्टरमध्ये उद्योगाचा विस्तार केला होता. पण नशिबाचे फासे असे फिरले की एका क्षणात सर्व उद्ध्वस्त झालं. एक काळ असा होता की रेल्वेनंतर सर्वाधिक रोजगार देणारी सहारा कंपनी होती. सहारा कंपनीकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.
4 / 7
रिअल इस्टेटपासून एअरलाइन्स, क्रिकेट, सिनेमा क्षेत्रात सहाराचं नाण एकदम खणखणीत वाजत होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार २०१३-१४ सालात सहारा समूहाची एकूण संपत्ती ११ अब्ज डॉलर इतकी होती. देशातच नव्हे, तर परदेशातही सहारा यांच्या मालमत्ता होत्या. न्यूयॉर्कचं प्लाझा हॉटेल आणि लंडनचं ग्रॉसवेनर हाऊसवरही सुब्रतो यांचा मालकी हक्क राहिला आहे.
5 / 7
सहारा यांच्याकडे २५९९०० कोटींहून अधिक वैयक्तिक संपत्ती होती. तसंच त्यांच्याकडे जवळपास ३०९७० एकर इतकी जमीन होती. याशिवाय देशभरात ५ हजाराहून अधिक ऑफीस यूनिट्स आहेत. लखनौचं सहारा शहर, सहाराचे ऑफीसेस, सहारा मॉल अशा संपत्तींचाही यात समावेश आहे. कंपनीच्या वेबसाइटच्या माहितीनुसार सहारा ग्रूपकडे एकूण ९ कोटी गुंतवणूकदार आहेत. देशातील वेगवेगळ्या भागात त्यांच्याकडे अब्जावधी रुपयांची जमीन आणि हॉटेल्स नावावर आहेत.
6 / 7
सहारानं रिअर इस्टेट, फायनान्स, इन्फ्रास्ट्रक्चर, मीडिया अँड एंटरटेन्मेंट, हेल्थ केअर, हॉस्पिटॅलिटी, रिटेल आणि इन्फॉरमेशन टेक्नोलॉजी सेक्टरमध्ये नशीब आजमावलं. क्रिकेटपासून ते सिनेमा क्षेत्रातही त्यांनी गुंतवणूक केली. तसंच ते भारतीय क्रिकेट संघाचेही प्रायोजक राहिले आहेत. आयपीएल आणि फॉर्म्युला वन टीमचे मालक देखील राहिले आहेत. सहारा यांनी एअरलाइन्स सेवा देखील सुरू केली होती.
7 / 7
सहारानं रिअर इस्टेट, फायनान्स, इन्फ्रास्ट्रक्चर, मीडिया अँड एंटरटेन्मेंट, हेल्थ केअर, हॉस्पिटॅलिटी, रिटेल आणि इन्फॉरमेशन टेक्नोलॉजी सेक्टरमध्ये नशीब आजमावलं. क्रिकेटपासून ते सिनेमा क्षेत्रातही त्यांनी गुंतवणूक केली. तसंच ते भारतीय क्रिकेट संघाचेही प्रायोजक राहिले आहेत. आयपीएल आणि फॉर्म्युला वन टीमचे मालक देखील राहिले आहेत. सहारा यांनी एअरलाइन्स सेवा देखील सुरू केली होती.
टॅग्स :Subroto Royसुब्रतो रॉय