शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

का गायब होतायत ATM मधून २ हजारांच्या नोटा? रिझर्व्ह बँकेनं सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 1:30 PM

1 / 8
तुम्हाला आठवतंय तुमच्या हाती अखेरची २ हजारांची नोट कधी आली होती. थोडं आठवून पाहा कदाचित तुम्ही ते २ हजार रुपयांचे सुट्टे करण्यासाठी फिरतही असाल. कदाचित जास्त वेळ झालाही असेल. सध्या या नोटांचं सर्क्युलेशन कमी झालं आहे.
2 / 8
रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात याबाबत मोठी माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात 2000 रुपयांच्या नोटा का कमी होत आहेत याचे मोठे कारण समोर आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2019-20, आर्थिक वर्ष 2020-21 आणि आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही. त्यामुळे बाजारात 2000 रुपयांच्या नोटांचे सर्क्युलेशन कमी झाले आहे.
3 / 8
नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट जारी केली. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर सर्व 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या.
4 / 8
या चलनांऐवजी रिझर्व्ह बँकेने 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या होत्या. चलनातून बाहेर काढलेल्या नोटांचे मूल्य 2000 रुपयांची नोट सहज भरून काढेल असा रिझर्व्ह बँकेचा विश्वास होता. अहवालानुसार, 2000 रुपयांच्या नोटेमुळे उर्वरित नोटांची गरज कमी झाली आहे.
5 / 8
31 मार्च 2017 पर्यंत, चलनात असलेल्या नोटांच्या एकूण मूल्यामध्ये 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा 50.2 टक्के होता. त्याच वेळी, 31 मार्च 2022 रोजी चलनात असलेल्या एकूण नोटांच्या मूल्यात 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा 13.8 टक्के होता. मात्र, रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा बंद केल्या नसून त्या केवळ छापल्या जात नाहीत.
6 / 8
2017-18 मध्ये देशात 2000 रुपयांच्या सर्वाधिक नोटा चलनात होत्या. यादरम्यान बाजारात 2000 च्या 33,630 लाख नोटा चलनात होत्या. त्यांची एकूण किंमत 6.72 लाख कोटी रुपये होती.
7 / 8
2021 मध्ये मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत माहिती दिली होती की, गेल्या दोन वर्षांपासून 2000 रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही. वास्तविक, आरबीआयशी चर्चा केल्यानंतर सरकार नोटांच्या छपाईबाबत निर्णय घेते. एप्रिल 2019 पासून रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही.
8 / 8
2000 रुपयांच्या नोटांची छपाई न झाल्यामुळे आता लोकांच्या हातात त्या नोटा कमी दिसत आहेत. त्यामुळेच एटीएममधून या नोटा फार कमी वेळा मिळत आहेत. येत्या काळात रिझव्‍‌र्ह बँक त्याची छपाई सुरू करणार की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणIndiaभारतbankबँक