शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
  • पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान.
  • गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान
  • केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
  • Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
  • झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
  • दुपारी दीड वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 32 टक्के मतदान
  • लातूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.२७% मतदान
  • महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी एकूण २९.४४% मतदान झालेले आहे
  • सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
  • PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
  • रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाला उत्साही सुरुवात, ११ वाजेपर्यंत २२.९३ टक्के मतदान
  • कोल्हापुरातील शिरोलीत भगवी टोपी घालण्यावरुन हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वाद
  • हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम इति पांडेय यांनी भुसावळ येथील डी.एस. हायस्कूल केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • आमदार राजू कारेमोरे त्यांच्या पत्नी रंजिता कारेमोरे व मुलगी वैभवी व वैभव सहकुटुंब त्यांची मूळ गाव एकलारी येथील मतदान केंद्रावर मतदान करताना.
  • ठाणे जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १६.६३ टक्के मतदान
  • केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्नी मोनिका आणि कन्या सिद्धी यांच्यासमवेत कोथरूड येथील एमआयटी स्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
  • १०३ वय वर्ष असणारे स्वातंत्र्यसैनिक जी.जी. पारिख यांनी मलबार हिल मतदार संघात मतदानाचा हक्क बजावला.
  • मुलुंड म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या प्रणव पालवे (२१) या तरुणाने दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला.
  • ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी जामनेर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • अकोला जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १६.३४ टक्के मतदान!
  • विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्क येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते अकरा या वेळेत 15.66% मतदान झालेले आहे.
  • दुसऱ्या सत्रात नाशिकमध्ये वाढला मतदानाचा टक्का
  • ठाणे - येणारे सरकार पूर्णपणे महायुतीचं, बहुमताचं असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मतदानानंतर प्रतिक्रिया.
  • नाशिक : जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८२ टक्के मतदान. शहरात सर्वाधिक मध्य मतदारसंघात १८.४२टक्के मतदान. जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघात २६.४१टक्के तर मालेगाव मध्यमध्ये २२.७६ टक्के मतदान.
  • रायगड जिल्हा ७ विधानसभा मतदारसंघ सकाळी ७ ते ११ या कालावधीत २०.४०% मतदान
  • कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.२२ टक्के मतदान झाले.
  • सकाळच्या दोन तासांत नाशिक शहरात सरासरी ६ टक्के मतदान
  • अकोल्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी मतदान केंद्राची पाहणी करीत, मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. ज्येष्ठ मतदारांशी संवाद साधला!
  • वर्सोवा विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती लव्हेकर यांनी आज सकाळी चार बंगला येथील ग्यान केंद्र शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
  • नितीन गडकरी यांनी सहपरिवारासोबत टाऊन हॉल महाल येथे मतदानाचा हक्क बजावला.
  • जळगाव : पळासखेड ता. भडगाव येथे सकाळी १०.३० वाजेपर्यंत १८००पैकी ३०जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
  • पोलीस आयुक्त मुंबई विवेक फणसळकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले व गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी कुटुंबीयांसह बजाविला मतदानाचा अधिकार.
  • विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
  • राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • नांदेड: रवी नगर भागात एक तासापासून ईव्हीएम बंद आहे, मतदार प्रतीक्षेत, दोन मशीनमध्ये झाला बिघाड, १८२ मतदान केंद्र क्रमांक
  • सोलापूर : सोलापुरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ; बूथ प्रमुख, नेतेमंडळी व पक्षाच्या प्रमुखांसोबत कार्यकर्त्यांचे मतदान सुरू
  • तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

Ratan Tata : रतन टाटा श्रीमंतांच्या यादीत टॉपला का नाहीत माहितीये?, ४३२ भारतीय आहेत त्यांच्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 7:34 PM

1 / 12
टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा हे केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपतींपैकी एक आहेत. रतन टाटा हे 1990 ते 2012 पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष होते. ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत त्यांनी हंगामी अध्यक्ष म्हणूनही काम केले. भारतातील सर्वात मोठे उद्योगपती आणि कोणत्याही मदतीसाठी तत्पर असूनही, टाटा श्रीमंतांच्या यादीत खालीच आहेत.
2 / 12
IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2021 नुसार रतन टाटा यांच्यापेक्षाही पुढे तब्बल 432 भारतीय श्रीमंत असल्याचे दिसून आले होते. जवळपास सहा दशके भारतातील एका सर्वात मोठ्या व्यावसायिक साम्राज्याचे नेतृत्व करणारे आणि अद्यापही अनेक कंपन्यांवर प्रभाव असलेल्या व्यक्ती पहिल्या 10 किंवा 20 श्रीमंत लोकांच्या यादीत अशी अपेक्षा असूच शकते. तथापि, टाटा पहिल्या 100 श्रीमंत लोकांच्या यादीतदेखील नाहीत आणि याचं कारण टाटा ट्रस्टच्या माध्यमातून टाटांनी केलेल्या प्रचंड परोपकारी कार्ये असू शकतात.
3 / 12
रतन टाटा यांना मुख्यत्वे टाटा सन्स कडून मिळालेली संपत्ती 3,500 कोटी रूपये होती, ज्यामुळे त्यांना IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2021 मध्ये 433 वं स्थान देण्यात आले होते.
4 / 12
गेल्या वर्षीच्या यादीत, टाटा 6,000 कोटी रुपयांच्या संपत्तीसह 198 व्या क्रमांकावर होते. रिसर्च हाऊसने इक्विटीमध्ये तेजी असूनही टाटांच्या मालमत्तेत झपाट्याने घट का झाली आहे हे स्पष्ट केले नाही.
5 / 12
Razorpay चे हर्षिल माथूर आणि शशांक कुमार, Rosari Biotech चे एडवर्ड मिनेझिस आणि सुनील चारी, DCM श्रीरामचे श्रीराम बंधू आणि एन राधाकृष्ण रेड्डी आणि Rain Industries च्या कुटुंबासह रतन टाटा हे यादीत 433 व्या स्थानावर आहेत.
6 / 12
टाटा यांची संपत्ती बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला (22,300 कोटी रूपये) आणि रामदेव अग्रवार (4,400 कोटी रूपये) यांच्यापेक्षाही कमी आहे. आतापर्यंत टाटांनी अनेक ट्रस्ट्सची स्थापना केली आहे. सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट हे टाटा ट्रस्टच्या खाली काम करणारे सर्वात मोठे ट्रस्ट्स आहेत.
7 / 12
टाटा समूहाची मुख्य कंपनी टाटा सन्सचा दोन तृतीयांश हिस्सा या ट्रस्टकडे आहे. याचाच अर्थ टाटा सन्सची 66 टक्के इक्विटी टाटा ट्रस्टकडे आहे आणि ट्रस्टच्या परोपकारी कामांसाठी लाभांश वळवला जातो.
8 / 12
जेएन टाटा स्कॉलर डॉ. शशांक शाह यांनी त्यांच्या 'द टाटा ग्रुप: फ्रॉम टॉर्चबिअरर्स टू ट्रेलब्लेझर्स' या पुस्तकात टाटा हे श्रीमंत का नाहीत याचा उल्लेख केला आहे. कसे भारतीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या/व्यवसाय दोन्हींमध्ये जी कंपनी पुढे जाते ती संघटनेत जास्तीत जास्त वैयक्तिक संपत्ती कशी ठेवते, याचा उल्लेख त्यात केला आहे. जेफ बेझोस, बिल गेट्स, वॉरेन बफे आणि मुकेश अंबानी अशी काही नावं यात असल्याचंही त्यांनी म्हटलेय.
9 / 12
मोठ्या व्यवसायांबाबत संस्थापक आणि नेते जगातील सर्वात धनवान लोकांपैकी एक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. त्यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की त्यांच्या मालकीच्या आणि चालवलेल्या कंपन्यांमधील त्यांची इक्विटी स्टेक हा एक प्रमुख घटक आहे. तथापि, टाटा समूहाच्या बाबतीत, भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत टाटा कुटुंब किंवा अध्यक्ष रतन टाटा यांचे नाव नाही.
10 / 12
एकट्या रतन टाटा यांच्या बाबतीत असे घडले नाही, असेही शहा यांच्या संशोधनातून समोर आले आहे. माजी चेअरमन जेआरडी टाटा यांच्याबाबतही असेच झाले.
11 / 12
2019 मधील एका पोस्टमध्ये शाह यांनी लिहिले आहे की, 'नोव्हेंबर 1985 मध्ये बॉम्बे मासिकातील एका लेखात जेआरडी टाटांची वैयक्तिक संपत्ती अंदाजे 28 कोटी रुपये होती असे नोंदवले गेले. जेआरडीने प्रकाशनाची पुनरावृत्ती केली आणि रेकॉर्डवर ठेवले की त्यांची पत्नी आणि त्यांची वैयक्तिक गुंतवणूक, ज्यात अपार्टमेंट आहे. त्याचे मूल्य ६० लाख रुपये आहे. त्यांच्या नावावर असलेले इतर सर्व शेअर्स केवळ सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त म्हणून होते ज्यात त्यांचे वैयक्तिक स्वारस्य नव्हते.'
12 / 12
रतन टाटा श्रीमंत आहेत, परंतु अब्जाधीश होण्यापासून अजून दूर आहेत. पीटर केसी त्यांच्या 'द स्टोरी ऑफ टाटा: 1868 ते 2021' या पुस्तकात म्हणतात की रतन टाटांचे संगोपन भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील एका महिलेने केले होते.
टॅग्स :Ratan Tataरतन टाटाMukesh Ambaniमुकेश अंबानीAdaniअदानी