Will gold price up again US-Britain refuse to accept Russian gold
सोने पुन्हा महागणार? अमेरिका-ब्रिटनने रशियाचे सोने घेण्यास दिला नकार By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 3:25 PM1 / 10युक्रेनचे युद्ध जसजसे पुढे जात आहे तसतसे अमेरिकेसह पश्चिमी देशांकडून रशियावर निर्बंध लादण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. जी-७ देशांनी रशियाकडून सोने आयातीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.2 / 10जगभरात सोन्याच्या दरात वाढ होणार असली तरी, भारतासाठी स्वस्त सोने खरेदीची संधी निर्माण झाली आहे. रशियाच्या सोन्यावर जी-७ देशांनी निर्बंध घातल्यानंतर रशिया भारताला कच्च्या तेलाप्रमाणे सोनेही स्वस्त किमतीत ॲाफर करू शकते. त्याचा भारतीय व्यापाऱ्यांसह भारतीयांना मोठा फायदा होणार आहे.3 / 10भारतासाठी संधी आहे का? - कच्च्या तेलाप्रमाणे सोने आयातीवरही बंदी घातल्याने रशियाकडून भारताला खरेदीची ऑफर येऊ शकते. एप्रिलमध्ये रशियाने भारताला अतिशय स्वस्तात कच्चे तेल खरेदी करण्याची योजना सादर केली होती. त्यानंतर केवळ दोन महिन्यांमध्ये रशियाकडून तेल खरेदी ५० पट वाढली आहे. सोन्याच्याबाबतीतही हीच संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.4 / 10रशियाने वर्ष २०२० मध्ये तब्बल १९ अब्ज डॉलरची सोने निर्यात केली. रशियाची जगभरात सोने निर्यातीमध्ये ०५% हिस्सेदारी आहे.5 / 10सोने महाग होण्यामागील कारणे काय? - ऊर्जानंतर सोन्याचा रशिया दुसरा सर्वात मोठा निर्यातदार आहे. २०२० मध्ये रशियाने १९ अब्ज डॉलर किमतीच्या सोन्याची निर्यात केली होती, जी एकूण जगभरातील सोन्याच्या निर्यातीपैकी ५% होती.6 / 10रशियाच्या सोन्यावर बंदी घातल्याने रशियाला जागतिक बाजारात प्रवेश करणे कठीण होईल. यामुळे जागतिक बाजारात सोन्याचा पुरवठा कमी होणार असून, त्यामुळे काही प्रमाणात सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.7 / 10या देशांना नको रशियाचे सोने? - अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी नुकतेच म्हटले की, जी-७ सदस्य देश म्हणजेच अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जपान, फ्रान्स, कॅनडा आणि इटली या देशांनी रशियातून सोने आयातीवर निर्बंध घालण्यास मान्यता दिली आहे.8 / 10महाराष्ट्र, गुजरातला फटका - रशियावरून मोठ्या प्रमाणात कच्चे हिरे गुजरातमध्ये प्रक्रिया करण्यासाठी मागवले जातात. प्रक्रिया करून ते अमेरिकेसह इतर देशांना पाठवले जातात. मात्र अमेरिकेने हिरे घेण्यास नकार दिल्याने लाखो कामगारांवर बेकार होण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रालाही त्याचा फटका बसला आहे.9 / 10अशा वाढल्या किमती -10 / 10भारताने गेल्या पाच वर्षांत केलेली सोन्याची आयात... आणखी वाचा Subscribe to Notifications