शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता ‘टाटा’ही रिटेल व्यवसायात उतरणार? सुपर अ‍ॅपच्या माध्यमातून जियोमार्ट, अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टला टक्कर देणार

By बाळकृष्ण परब | Published: September 29, 2020 3:08 PM

1 / 9
टाटा समुहाने देशातील रिटेल व्यवसायामध्ये जियोमार्ट, अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी टाटा समुहाकडून डिजिलट प्लॅटफॉर्मचा विकास करण्यासाठी आणि एक सुपरअ‍ॅप विकसित करण्याची तयारी सुरू आहे.
2 / 9
दरम्यान, टाटा समुहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये दिग्गज बहुराष्ट्रीय कंपनी वॉलमार्टकडून २० ते २५ अब्ज डॉलर (सुमारे १. ८५ लाख कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सध्या चर्चा सुरू आहे.
3 / 9
मिंटने दिलेल्या वृत्तानुसार वॉलमार्ट आणि टाटा समूहामध्ये या संभाव्य कराराबाबत चर्चा सुरू आहे. यापूर्वी वॉलमार्टने २०१८ मध्ये फ्लिपकार्टमध्ये सुमारे १६ अब्ज डॉलरची गुंतवणूक करत ६६ टक्के भागीदारीची खरेदी केली होती.
4 / 9
आता टाटा समूहासोबतचा वॉलमार्टचा करार हा फ्लिपकार्टपेक्षाही मोठा असण्याची शक्यता आहे. या करारासाठी वॉलमार्टकडून २० ते २५ हजार अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येण्याची शक्यता आहे. जर हा करार पूर्णत्वास गेला तर सुपरअ‍ॅप टाटा समूह आणि वॉलमार्टचा संयुक्त प्रकल्प ठरण्याची शक्यता आहे.
5 / 9
ब्लूमबर्गमधील वृत्तानुसार या व्हेंचरसाठी गुंतवणूक आणण्यासाठी किंवा रणनीतिक गुंतवणूक मिळवण्यासाठी टाटा सन्सकडून अनेक सल्लागारांसोबत चर्चा सुरू आहे.
6 / 9
टाटाचा हा डिजिटल प्लॅटफॉर्म त्याच्या बेवरेजपासून ज्वेलरीपर्यंत आणि रिसॉर्ट्सपर्यंत सर्व उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. एवढेच नाही तर यावरून जेवणाची ऑर्डर, हेल्थकेअर सुविधा, वित्तसेवा, फॅशन, लाइफ स्टाइल, इलेक्ट्रॉनिक्स बिल पेमेंट यासारख्या सुविधा आणि उत्पादनेसुद्धा उपलब्ध होतील.
7 / 9
मात्र सध्यातरी दोन्ही कंपन्यांमधील बोलणी सध्या प्राथमिक अवस्थेत आहेत. हल्लीच रिलायन्स इंडस्ट्रीजचे रिटेल व्हेंचर असलेल्या रिलायन्स रिटेलमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी १.६ लाख कोटींची गुंतवणूक केली होती. परकीय गुंतवणूकदार विशेषकरून अमेरिकी बहुराष्ट्रीय कंपन्या आता भारताच्या दिशेने वळत आहेत. कारण चीनच्या तुलनेत सुरक्षित आणि मोठा बाजार त्यांना दिसत आहे.
8 / 9
दरम्यान, टाटा समुहाने यापूर्वी तनिष्क ज्वेलरी स्टोअर, टायटन वॉच, स्टार बाजार, ताज हॉटेल्स, स्टारबक्स सोबत जॉईंट व्हेंचर, वेस्टसाइट, टाटा क्लिक्स, टाटा स्काय. क्रोमा आणि स्टारक्विक या माध्यमांमधून ऑनलाइन बाजारात प्रवेश केलेला आहे.
9 / 9
टाटाचे नवे सुपर अ‍ॅप या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला बाजारात येण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Tataटाटाbusinessव्यवसायonlineऑनलाइनShoppingखरेदी