शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jio आणि Airtel च्या या प्लॅन्ससोबत Amazon Prime फ्री, सोबत डेटा बेनिफिट्सही मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 2:06 PM

1 / 6
सध्या सर्वच दूरसंचार कंपन्यांमध्ये आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी आणि नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवनवे प्लॅन्स आणि ऑफर्स आणत आहेत. रिलायन्स जिओ काही पोस्टपेड प्लॅन्ससह Amazon Prime Video सबसक्रिप्शन देत आहे.
2 / 6
कंपनी यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज मोफत 100 एसएमएसही देत आहे. कंपनी 399 रुपयांच्या प्लॅनसोबत 75 जीबी डेटा ऑफर करते. डेटा संपल्यानंतर ग्राहकांना प्रति जीबीसाठी 10 रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय ग्राहकांना Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन मिळतं.
3 / 6
कंपनी 599 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन्ससोबतदेखील Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन देण्यात येतं. यामध्ये ग्राहकांना 200 जीबी डेटा रोलओव्हरची सुविधाही दिली जाते. 799 रुपयांच्या 150 जीबीच्या प्लॅनमध्येदेखील Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन देण्यात येतं.
4 / 6
कंपनीकडे 999 रुपये आणि 1499 रुपयांचा प्लॅनदेखील आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ओटीटी बेनिफिट्सही दिले जातात. 999 रुपयांच्या या प्लॅनसोबत 200 जीबी आणि 1499 रुपयांच्या प्लॅनसोबत 300 जीबी डेटा दिला जातो.
5 / 6
एअरटेलचे चार पोस्टपेड प्लॅन्स ओटीटी बेनिफिट्ससह येतात. कंपनीचा 499 रुपयांचा प्लॅन Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar सह येतो. तसंच यात 75 जीबी डेटा येतो. 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 जीबी डेटा आणि Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन मिळतं.
6 / 6
याशिवाय 1199 रुपये आणि 1499 रुपयांच्या प्लॅन्ससोबत Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन दिलं जातं. 1199 रुपयांच्या प्लॅनमध्ये 150 जीबी डेटा आणि 1499 रुपयांच्या प्लॅनसोबत 200 जीबी डेटा दिला जातो.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेल