शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 6:29 PM

1 / 8
काही दिवसांपूर्वीच सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले होते. मात्र आता सोन्या-चांदीचे दर कमी होताना दिसत आहे. या वर्षीचा ऐतिहासिक विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोने 5400 रुपयांपर्यंत घसरले आहे. सोने आणि चांदी दोन्ही त्यांच्या विक्रमी उच्चांकापेक्षा बरेच खाली आले आहेत. विशेषत: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर.
2 / 8
3 वर्षातील सर्वात मोठी घसरण - गेल्या आठवडा सोन्यासाठी सर्वात वाईट ठरला. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात 4 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून आली. महत्वाचे म्हणजे, गेल्या तीन वर्षांतील एका आठवड्यातील ही सर्वात मोठी घसरण आहे.
3 / 8
याच बरोबर सोन्याच्या दराने 2 महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 75813 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकावरून 5400 रुपयांपर्यंत घसरला आहे.
4 / 8
असं आहे अमेरिका कनेक्शन - अमेरिकन निवडणुकांच्या निकालानंतर सोन्याच्या किमतीत घसरण बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डॉलर निर्देशांक वाढला आहे. ट्रम्प यांच्या पुनरागमनामुळे डॉलर मजबूत झाला आहे.
5 / 8
...याशिवाय, आता लवकरच रशिया-युक्रेन युद्ध संपेल, अशा अपेक्षा वाढल्या आहेत. यामुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणीही कमी झाली आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर बिटकॉइनच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाडल्याचे दिसत आहे. या सर्व फॅक्टर्समुळे सोन्यावरील दबाव वाढत आहे.
6 / 8
सोने खरेदी करावे की थांबावे...? - बाजारातील जाणकारांच्या मते, अल्पावधीत सोन्याच्या किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. एचडीएफसी सिक्युरिटीचे अनुज गुप्ता यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, सोन्याच्या दरात येत्या एक ते दीड महिन्यात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे. सोन्याचा भाव आणखी घसरून 5000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत येण्याची शक्यता आहे.
7 / 8
असे आहेत सोन्याचे आजचे दर - 24 कॅरेट सोन्याची किंमत 73739 रुपये प्रति 10 ग्रॅम. 23 कॅरेट सोन्याची किंमत 73444 रुपये प्रति 10 ग्रॅम. 22 कॅरेट सोन्याची किंमत 67545 रुपये प्रति 10 ग्रॅम.
8 / 8
तसेच, 18 कॅरेट सोन्याची किंमत 55304 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 14 कॅरेट सोन्याची किंमत 43137 रुपये प्रति 10 ग्रॅम.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीMarketबाजार