शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महिलांना गुंतवणूक करायची असेल तर 'या' योजना ठरतील फायदेशीर! मिळेल चांगला परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 8:46 AM

1 / 8
नवी दिल्ली : जर तुम्हाला आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठी एक मोठा फंड असणे आवश्यक असते. गुंतवणूकीत पुरुष साधारणतः स्टॉक मार्केट (Stock Market), रिअल इस्टेट आणि म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करतात.
2 / 8
त्याचप्रमाणे महिलांची पसंती सोने आणि मुदत ठेवींमध्ये (Fixed Deposit) गुंतवणूक करायची असते, परंतु आजकाल त्यांची गुंतवणुकीची पसंत देखील बदलत आहे. काही महिलांनी गुंतवणुकीचा ट्रॅक बदलविला आहे.
3 / 8
सोने आणि फिक्स्ड डिपॉजिटपेक्षा ही त्या गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहेत. त्यांचा म्युच्युअल फंडाकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.अनेक महिला गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूकही वाढवली आहे. महिलांना गुंतवणुकीसाठी इक्विटी फंड हा चांगला पर्याय आहे.
4 / 8
हा महागाईला मात देण्यासाठी सर्वोत्तम म्युच्युअल फंड मानण्यात येतो. यामध्ये जोखिम असली तरी अधिक फायदा होतो. या फंडात दीर्घ गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. त्यामुळे महिलांना गुंतवणुकीचा पर्याय काय आहेत आणि त्यांचा कुठे गुंतवणूक (Investment) करण्याचा कल आहे ते पाहुयात..
5 / 8
जर तुम्ही कोणतीही जोखीम घेण्यास तयार नसाल आणि दीर्घकाळ गुंतवणूक करू शकत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी अधिक चांगला असू शकतो. तसे, यासाठी तुमचा पहिला पर्याय म्हणजे फिक्स्ड डिपॉजिट. पण जर तुम्हाला यापेक्षा चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही डेट फंडात गुंतवणूक करू शकता. याचा त्यांना अधिक फायदा होईल.
6 / 8
हा म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये एकाच फंडात अनेक मालमत्ता वर्ग आहेत. हा तुमच्यासाठी फायदेशीर करार ठरू शकतो. इक्विटी आणि डेट फंड या दोन्हीमध्ये या फंडातंर्गत गुंतवणूक केली जाते. यामध्ये जोखिमही कमी असते. त्यामुळे यामधील गुंतवणूक फायद्याची ठरते.
7 / 8
या स्कीमद्वारे कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली जाते. त्याला ग्रोथ फंड असेही म्हणतात. ज्यामध्ये गुंतवणूक करणे खूप सोपे आहे आणि यामध्ये कमी जोखमीवर चांगला परतावा मिळतो.
8 / 8
सोन्यात गुंतवणूक करणे ही महिलांची पहिली पसंती आहे. तरुण पिढीलाही सोन्यात गुंतवणूक करायला आवडते. आजच्या महिलाही कमी जोखीम आणि चांगला परतावा असलेले पर्याय शोधत आहेत. यावेळी ऑनलाइन अनेक माध्यमातून डिजिटल सोन्यात गुंतवणूक करणे हे देखील एक सुरक्षित माध्यम आहे.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकWomenमहिलाMONEYपैसाGoldसोनं