शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Work From Home करताय?, पाहा कोणत्या कंपनीचा डेटा प्लॅन आहे बेस्ट, कुठे मिळतायत अधिक बेनिफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 6:11 PM

1 / 13
Jio Vs Airtel Vs Vodafone Idea Best Recharge Plan: सध्या देशात कोरोना विषाणूनं हाहाकार माजवला आहे. अनेक राज्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधही लादले आहेत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना घरूनच काम करावं लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी उत्तम इंटरनेट कनेक्शन आणि डेटा प्लॅन हा महत्त्वाचा आहे.
2 / 13
वर्क फ्रॉम होमसाठी दररोज ३ जीबी डेटादेखील उपयुक्त ठरू शकतो. जाणून घेऊया रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांपैकी कोण देतंय बेस्ट प्लॅन्स.
3 / 13
रिलायन्स जिओच्या ४०१ रूपयांच्या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा देण्यात येतो. याशिवाय कंपनी अतिरिक्त ६ जीबी डेटादेखील देते. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे.
4 / 13
याशिवाय या प्लॅनमध्ये दररोड १०० एसएमएस, अनलिमिटेड व्हॉईस कॉल, डिस्ने हॉटस्टार प्लस, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, सिक्युरिटी आणि क्लाऊडसारख्या अॅप्सचीही सुविधा देण्यात येत आहे.
5 / 13
९९९ रूपयांच्या जिओच्या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. यामध्ये दररोज ३ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच यात दररोज १०० एसएमएसचा फायदाही मिळतो. योसोबतच अनिलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, सिक्युरिटी आणि क्लाऊडसारख्या अॅप्सचीही सुविधा देण्यात येते.
6 / 13
३४९ रूपयांच्या जिओच्या प्लॅमध्ये ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा देण्यात येतो. याशिवाय या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएससारखी बेनिफिट्सही मिळतात. यासोबतच ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, सिक्युरिटी आणि क्लाऊडसारख्या अॅप्सचीही सुविधा देण्यात येते.
7 / 13
एअरटेलच्या ५५८ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच यात दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येत असून या प्लॅनची वैधता ५६ दिवसांची आहे.
8 / 13
एअरटेलच्या ३९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. तसंच यामध्ये दररोज ३ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा देण्यात येते.
9 / 13
एअरटेलच्या ४४८ रूपयांच्या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. यामध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. तसंच यासोबत अनिलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस प्रति दिवसांचं बेनिफिटही देण्यात येतं.
10 / 13
व्होडाफोन-आयडियाच्या ८०१ रूपयांच्या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. तसंच या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लॅनसोबत ग्राहकांना ४८ जीबी अतिरिक्त डेटाही देण्यात येतो. याशिवाय दररोज १०० एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि डिस्ने हॉटस्टार, व्ही मुव्हिजचाही अॅक्सेस देण्यात येतो.
11 / 13
व्होडाफोन-आयडियाच्या ४०१ रूपयांच्या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. यामध्ये दररोज ३ जीबी डेटासह १६ जीबी अतिरिक्त डेटा देण्यात येतो. यामध्येही ग्राहकांना दररोज १०० एसएमएस, डिस्ने हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन आणि व्ही मुव्हिजचा अॅक्सेस देण्यात येतो.
12 / 13
५५८ रूपयांच्या प्लॅनची वैधता ५६ दिवसांती आहे. दररोज ३ जीबी डेटा बेनिफिट्ससह अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा देण्यात येते. याशिवाय ग्राहकांना दररोज १०० एसएमएसही देण्यात येतात.
13 / 13
३९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज ३ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगचं बेनिफिटही देण्यात येतं. तसंच दररोज १०० एसएमएस व्ही मुव्हिज आणि टीव्हीचाही अॅक्सेस देण्यात येतो.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाInternetइंटरनेट