शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मेकॅनिक म्हणून केलं काम, आज बुर्ज खलिफामध्ये २२ अपार्टमेंट; चित्रपटापेक्षा कमी नाही यांची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 8:40 AM

1 / 7
दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. बहुतेक भारतीयांसाठी, बुर्ज खलिफामध्ये अपार्टमेंट खरेदी करणं हे एक स्वप्न असू शकतं. पण भारतीय उद्योगपती जॉर्ज व्ही नेरेपरांबिल यांची कहाणीच निराळी आहे. त्यांनी बुर्ज खलिफामध्येच एक नाही तर अनेक अपार्टमेंट्स खरेदी केल्या आहेत. दरम्यान, ते या आयकॉनिक इमारतीचे सर्वात मोठे प्रॉपर्टी ओनर बनलेत.
2 / 7
त्यांचे बुर्ज खलिफा मध्ये २२ आलिशान अपार्टमेंट आहेत. जॉर्ज तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीत. ते अतिशय सामान्य कुटुंबातून आले आहे. एकेकाळी जॉर्ज यांनी मेकॅनिक म्हणूनही काम केलंय. त्यांचं यश लाखो लोकांना प्रेरणा देतं. बुर्ज खलिफामध्ये इतके अपार्टमेंट खरेदी करण्यामागे एक रंजक कथा आहे. जाणून घेऊ त्यांची कहाणी.
3 / 7
जॉर्ज वी नेरेपरांबिल यांचा जन्म केरळमधील एका सामान्य कुटुंबात झाला. सुरुवातीच्या काळात आर्थिक अडचणींमुळे जॉर्ज यांना वयाच्या ११ व्या वर्षी काम सुरू करावं लागलं. ते वडिलांना कॅस क्रॉपच्या व्यापारात आणि वाहतुकीत मदत करत असत. वडिलांना मदत करत त्यांनी उरलेल्या कापूस बियाण्यांपासून गोंद बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. तर दुसरीकडे वेस्ट सेलिंगच्या व्यवसायातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळू लागलं. यासह त्यांनी अनेक वर्षे कुटुंबाचा आर्थिक आधार दिला.
4 / 7
१९७६ मध्ये जॉर्ज शारजाहला पोहोचले. त्यावेळी मध्यपूर्वेतील अर्थव्यवस्था तेजीत होती. तेथे गेल्यानंतर त्याला वाळवंटातील उष्णतेचा सामना करण्यासाठी एअर कंडिशनिंग क्षेत्रातील मोठ्या संधींची जाणीव झाली. यानंतर जॉर्ज यांनी स्वतःची कंपनी सुरू केली. यामुळे त्यांना आखाती देशात एक प्रसिद्ध भारतीय व्यापारी म्हणून प्रस्थापित होण्यास मदत झाली.
5 / 7
जॉर्ज नेहमीच आशावादी राहिले. असाच एक प्रसंग आला जेव्हा त्यांच्या एका नातेवाईकानं त्यांची खिल्ली उडवली. एकदा त्याच्या नातेवाईकानं त्यांना सांगितलं की तो बुर्ज खलिफामध्ये कधीही जाऊ शकणार नाहीत. जॉर्ज यांनी हे आव्हान म्हणून स्वीकारलं. एकदा त्यांची नजर वर्तमानपत्रात या इमारतीत भाड्याच्या अपार्टमेंटच्या जाहिरातीवर पडली.
6 / 7
त्यांनी २०१० मध्ये अपार्टमेंट भाड्यानं घेतलं होतं. मग त्यात राहायला लागले. हळूहळू त्याने जगातील सर्वात उंच इमारतीत अनेक अपार्टमेंट्स विकत घेतले. बुर्ज खलिफा येथील ९०० लक्झरी अपार्टमेंटपैकी २२ त्यांच्या नावावर आहेत. यामुळे ते इमारतीतील सर्वात मोठे मालमत्तेचे मालक बनले.
7 / 7
जॉर्ज यांची एकूण संपत्ती ४,८०० कोटी रुपये आहे. बुर्ज खलिफामध्ये मालमत्ता असलेले ते सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक आहेत. जॉर्ज जगातील सर्वात उंच इमारतीतील त्यांच्या भव्य अपार्टमेंटमध्ये आलिशान जीवन जगतायत. तो ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात तो मजला, छत आणि भिंती सोन्यानं मढवलेल्या आहेत. त्यांना लक्झरी कार आणि विमानांचीही आवड आहे.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीDubaiदुबईbusinessव्यवसाय