शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बँकेत २० वर्ष नोकरी, ५० व्या वर्षी उभी केली हजारो कोटींची कंपनी; देशातील श्रीमंत महिला सीईओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 9:02 AM

1 / 9
आज महिला प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करतायत. व्यवसायत उतरणाऱ्या महिलांची संख्याही आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज देशातच नाही, तर परदेशातही भारतीय महिलांचा आवाज मोठ्या प्रमाणात घुमतोय. एक अशा महिला आहेत, ज्यांच्या नावाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्या म्हणजे फाल्गुनी नायर. फाल्गुनी नायर या एक बिझनेस वुमन आहेत.
2 / 9
फाल्गुनी नायर या देशातील सर्वात श्रीमंत महिला सीईओ बनल्या आहेत. फाल्गुनी नायर या सेल्फ मेड महिला अब्जाधीश आहेत. त्यांनी हे स्थान कोणत्याही वारशाने मिळालेल्या कंपनीच्या किंवा आई-वडिलांच्या पैशाच्या जोरावर मिळवलं नाही, तर त्यांनी स्वतः आपली ओळख निर्माण केलीये. फाल्गुनी नायर यांना भारतीय स्टार्टअप्सच्या क्विन असं म्हटलं जाते. ती नायकाच्या (Nykaa) संस्थापक आहे.
3 / 9
१९ फेब्रुवारी १९६३ रोजी मुंबईत जन्मलेल्या फाल्गुनी या एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत. फाल्गुनी नायर यांनी एएफ फर्ग्युसन कंपनीत मॅनेजमेंट कन्सल्टन्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली.
4 / 9
१९९३ मध्ये त्या कोटक महिंद्रा ग्रुपमध्ये सहभागी झाल्या आणि तिकडे २० वर्ष काम केलं. २००५ मध्ये त्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर झाल्या आणि २०१२ पर्यंत या पदावर होत्या. नोकरीत असताना त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केलं.
5 / 9
एमबीए करतानाच त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आली. वयाच्या ५० व्या वर्षी फाल्गुनी यांनी त्यांची चांगली नोकरी सोडली आणि २०१२ मध्ये नायकाची सुरुवात केली. नायका हा संस्कृत शब्द 'नायिका' पासून प्रेरित आहे. याचा अर्थ मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री.
6 / 9
फाल्गुनी नायर यांनी २०१२ मध्ये ब्युटी-वेलनेस उत्पादनं विकण्यासाठी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू केला. फाल्गुनी नायर यांचा हा उपक्रम पहिल्या दिवसापासून खूप यशस्वी झाला.
7 / 9
त्यांची कंपनी लवकरच फॅशन उत्पादनांसाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून लोकप्रिय कंपनी बनली. २०१४ मध्ये, Sequoia Capital India नं नायकामध्ये १ मिलियम डॉलर्सची गुंतवणूक केली. यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी कंपनीत पैसे गुंतवले.
8 / 9
फाल्गुनी नायर सध्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला सीईओ आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती २१,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. फाल्गुनी नायर या नायकामध्ये १६०० हून अधिक लोकांच्या टीमचं नेतृत्व करत आहेत.
9 / 9
Nykaa ही प्रामुख्याने एक ई-कॉमर्स वेबसाइट आहे जी लॅकमे, काया स्कीन क्लिनिक, लॉरियस पॅरिस यासह प्रमुख ब्रँड्सच्या ब्युटी आणि वेलनेस प्रोडक्ट्स ऑफर करते. त्यांची देशभरात १७ स्टोअर्स आहेत. आता त्यांचा विस्तार होत आहे. हळूहळू कंपनीचा विस्तार होऊ लागला.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी