world consumer rights day know about your rights
'जागो ग्राहक जागो', ग्राहक म्हणून तुमचा अधिकार काय? By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 8:56 PM1 / 5आज (15 मार्च) जागतिक ग्राहक हक्क दिन आहे. ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा. आजच्या जागतिकीकरण स्पर्धात्मक युगात हा ग्राहक राजा अतिशय महत्वाचा भाग झाला आहे. 2 / 5ग्राहक या नात्याने तुम्हाला अनेक अधिकार दिलेले आहेत. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नुसार ग्राहकांना वस्तू निवडणे, त्याची गुणवत्ता आणि दर्जा याचं प्रमाण जाणून घेण्याचा अधिकार आहे. तसेच, वस्तूंची खरेदी करताना बिल मागणे हा ग्राहकांचा अधिकार आहे.3 / 5ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच, ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण ही प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे. सरकारकडूनही ग्राहकांच्या जनजागृतीसाठी वेळोवेळी जाहिराती जारी केल्या जातात. तुमची फसवणूक होत असेल तर त्याची तक्रार कुठे करावी, याची माहिती तुम्हाला जाहिरातीमधून मिळते.4 / 5ग्राहक संरक्षण मंत्रालयाने jagograhakjago.gov.in ही खास नवी वेबसाईट लाँच केली आहे. या वेबसाईटवर ग्राहकांशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल. ग्राहकांचे अधिकार, तक्रार आणि इतर सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल.5 / 5अनेकदा खरेदी करतांना किंवा सर्व्हिसेसचा वापर करतांना ग्राहक बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि याचाच फायदा विक्रेते घेतात. त्यामुळे 'जागो ग्राहक जागो'. आणखी वाचा Subscribe to Notifications