शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गाडी-बंगला, नौकर-चाकर, बँक बॅलेन्स...; या 1 शेअरच्या किमतीत सर्वकाही शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 4:56 PM

1 / 7
या कंपनीचा केवळ एकच शेअर आपल्याला कोट्यधीश बनवेल. या एका शेअरची जेवढी किंमत आहे, तेवढा पैसा सामान्य माणूस आयुष्यभरातही कमावू शकणार नाही. या एका शेअरमुळे आयुष्य आर्थिकदृष्ट्या जबरदस्त होऊ शखते.
2 / 7
या स्टॉकचे नाव आहे, बर्कशायर हॅथवे इंक (Berkshire Hathaway Inc.), हा जगातील सर्वात महागडा स्टॉक आहे. या कंपनीच्या एका शेअरची किंमत सध्या 3.33 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. या एका शेअरमध्ये आपण घर, गाडी, नोकर-चाकर आणि बँक बॅलन्ससह फाइव्हस्टार आयुष्य जगू शकता.
3 / 7
वॉरेन बफे (warren buffett) हे जगातील सर्वात महागडा शेअर असलेल्या बर्कशायर हॅथवे इंक कंपनीचे प्रमुख आहेत. या कंपनीच्या एका शेअरची किंमत सध्या 4,17,250 डॉलर, म्हणजेच 3,33,43,907 रुपये एवढी आहे.
4 / 7
याच वर्षी 20 एप्रिलला हा शेअर 523550 डॉलर (म्हणजे, 4,00,19,376 रुपये) वर पोहोचला होता. अर्थात गेल्या तीन महिन्यांत हा शेअर जवळपास 20 टक्के घसरला आहे.
5 / 7
फोर्ब्सनुसार, दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांची बर्कशायर हॅथवेमध्ये तब्बल 16 टक्के हिस्सेदारी आहे. खरे तर, वॉरेन बफे ज्या कंपनीत गुंतवणूक करतात, त्या कंपनीचे भाग्यच उजळते, असे म्हटले जाते.
6 / 7
Berkshire Hathaway Inc.चा अधिकांश उद्योग अमेरिकेत आहे. तसेच या कंपनीत जवळपास 3,72,000 कर्मचारी काम करतात. आता ही कंपनी अमेरिकेशिवाय चीनमध्येही विस्तार करण्याची योजना आखत आहे.
7 / 7
वॉरेन बफे यांनी 1965 मध्ये या टेक्सटाइन कंपनीची धुरा आपल्या हाती घेतली होती. तेव्हा या कंपनीच्या एका शेअरची किंमत 20 डॉलर पेक्षाही कमी होती.
टॅग्स :businessव्यवसायInvestmentगुंतवणूकAmericaअमेरिका