शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 5:06 PM

1 / 6
कुठल्याही चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळवायची असल्यास मुलाखतीच्या प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. त्यासाठी अनेक कंपन्यांचे वेगवेगळे निकष असतात. मात्र काही कंपन्या अशा आहेत, ज्यांची मुलाखत प्रक्रिया ही सर्वात आव्हानात्मक असल्याचा दावा केला जातो. तसेच तिथे निवड झाल्यावर पगारही भरपूर मिळतो. अशाच काही कंपन्यांची माहिती आपण आता घेऊयात.
2 / 6
काही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गुगलची मुलाखतीची प्रक्रिया ही सर्वात आव्हानात्मक आणि कठीण असते. त्यातही गुगलच्या सॉफ्टवेअर इंजिनियर आणि डेटा सँटिस्टच्या पदासाठीची मुलाखत खूपच कठीण असते.
3 / 6
गोल्डमॅन सॅक्स या कंपनीकडून घेतली जाणारी मुलाखत ही सुद्धा फायनान्स आमि बँकिंग क्षेत्रातील सर्वात कठीण मुलाखतींपैकी एक मानली जाते. त्यासाठी सखोल तांत्रिक ज्ञान आणि वाणिज्यिक जागरुकता तसेच विश्लेषणात्मक क्षमता यांचीही गरज भासते.
4 / 6
भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेची मुलाखतही सर्वात कठीण मुलाखतींपैकी एक मानली जाते. यामध्ये उमेदवाराच्या ज्ञानाची सखोलता, तर्कसंगतता आणि निर्णय घेण्याची क्षमता तपासून पाहिली जाते.
5 / 6
स्पेस एक्स कंपनीची मुलाखतही कठीण मुलाखतींच्या श्रेणीमध्ये येते. विशेषकरून स्पेसएक्समध्ये इंजिनियरिंग आणि एअरोस्पेस क्षेत्रातील मुलाखती ह्या कठीण मानल्या जातात. तसेच अनेकदा स्वत: एलन मस्क हेच मुलाखत घेतात, असंही सांगितलं जातं.
6 / 6
ब्रिटनमधील अँलन अँड ओवरी लॉ फर्म कायदेशीर क्षेत्रातील आपल्या कठीण मुलाखतींसाठी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये कायद्याचं सखोल ज्ञान, केस स्टडी आणि उमेदवाराची तार्किक आणि विश्लेषणात्मक क्षमता परखून पाहिली जाते.
टॅग्स :jobनोकरीInternationalआंतरराष्ट्रीयEmployeeकर्मचारी