शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

UPI द्वारे चुकीचं पेमेंट केलंय? मग 'हे' काम त्वरित करा, पैसे येतील परत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2024 10:58 AM

1 / 6
गेल्या वर्षभरात ऑनलाईन व्यवहारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. देशात एप्रिल ते २४ जुलैदरम्यान यूपीआयच्या (UPI) माध्यमातून ८० लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. वेगाने वाढणाऱ्या डिजिटल व्यवहारांदरम्यान चुकून दुसऱ्या व्यक्तीच्या यूपीआय आयडीवर पैसे ट्रान्सफर झाल्याची काही प्रकरणे सुद्धा समोर येत आहेत. अशा परिस्थितीत काय करावे. त्यामुळे तुमची कमाई वाचवू शकतात. तर याबद्दल जाणून घ्या...
2 / 6
चुकून दुसऱ्या यूपीआय नंबरवर गेलेला निधी परत मिळविण्यासाठी तत्काळ बँकेला चूक कळवणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुमच्या बँक किंवा यूपीआय सेवा प्रदात्याशी त्वरित संपर्क साधा. तुम्ही जितक्या लवकर तक्रार नोंदवाल तितकी तुमची चुकीची रक्कम परत मिळण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही तक्रार करण्यास उशीर केल्यास, तुमचे पेमेंट शक्यतो परत येणार नाही.
3 / 6
तुमच्या बँक किंवा यूपीआय प्रदात्यासोबत चुकीचा यूपीआय आयडी, रक्कम आणि तारीख यासह व्यवहार तपशील शेअर करा. कारण, बहुतेक बँका आणि यूपीआय प्रदात्यांकडे अशा प्रकारच्या विवादांना सामोरे जाण्यासाठी प्रक्रिया असतात.
4 / 6
शक्य असल्यास, ज्या व्यक्तीला तुम्ही चुकून पेमेंट केले आहे, त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांना चुकून पैसे पाठवण्यात आल्याचे सांगा आणि परत पाठवण्याची विनंती करा. यामुळे लवकर तुमचे पैसे परत येतील आणि तुम्हाला समाधान मिळेल.
5 / 6
जर प्राप्तकर्त्या किंवा इतर पर्याय अयशस्वी झाल्यास एनपीसीआयकडे (NPCI) तक्रार करा, जी यूपीआय सिस्टमची देखरेख करते. एनपीसीआय चौकशी करून निराकरण करेल. यासाठी, तुम्ही एनपीसीआयच्या वेबसाइटला भेट देऊन किंवा १८००-१२०-१७४० या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तक्रार करू शकता.
6 / 6
व्यवहार आणि तक्रारींशी संबंधित सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवा. शेवटचा उपाय म्हणून, तुम्हाला फसवणुकीचा संशय असल्यास पोलीस तक्रार दाखल करण्याचा विचार करा. पोलिसांनी तुमची तक्रार गांभीर्याने न घेतल्यास तुम्ही कोर्टात सुद्धा जाऊ शकता.
टॅग्स :businessव्यवसायtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल