xiaomi top 5g android phone market q2 2021 share vivo oppo realme samsung strategy analytics
5G Smartphones च्या मागणीने सर्व रेकॉर्ड तोडले; Xiaomi सर्वाधिक विक्री करणारी कंपनी, पाहा यादी By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 9:54 AM1 / 155G स्मार्टफोनच्या वाढत्या मागणीमुळे, स्मार्टफोन उत्पादक जागतिक बाजारात 5G फोनची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्ट्रॅटेजी अॅनालिटिक्सने 5G मोबाईल फोनसाठी जागतिक स्मार्टफोन मार्केट डेटा जारी केला आहे.2 / 15 यामध्ये केवळ Android Smartphones चा समावेश आहे. विश्लेषकांच्या मते, 5G नेटवर्कला सपोर्ट करणाऱ्या 94.6 दशलक्ष अँड्रॉइड स्मार्टफोन डिव्हाइसेस या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जगभरात विक्री करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी 104% अधिक आहे. 3 / 15सर्वाधिक 5G स्मार्टफोनच्या विक्रीत शाओमीनं बाजी मारली. तर त्यानंतर चीनच्याच दोन कंपन्या विवो आणि ओप्पो यांचा समावेश आहे. 4 / 15विक्री झालेल्या 5G मोबाईल्सपैकी विवोच्या 18.5 आणि ओप्पोच्या 17.9 टक्के स्मार्टफोन्सची विक्री झाली. 5 / 15यामध्ये दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग ही 16.5 टक्के स्मार्टफोन्स विक्रीसह चौथ्या स्थानावर तरर 5.9 टक्के विक्रीसह Realme पाचव्या स्थानी आहे. 6 / 15जगभरात 5G तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने, स्मार्टफोन निर्माते अनेक स्मार्टफोन उत्पादक 5G तयार स्मार्टफोन लाँच करत आहेत. 7 / 15स्ट्रॅटेजी अॅनालिटिक्सचा अहवाल दर्शवितो की जागतिक Android 5G स्मार्टफोन बाजार दुसऱ्या तिमाहीत 104 टक्क्यांनी वाढून 94.6 दशलक्ष युनिट्स झाला.8 / 15जागतिक बाजारपेठेत शाओमीचे वर्चस्व होते आणि त्याची शिपमेंट 452 टक्क्यांनी वाढली.9 / 15जर आपण २०१९ च्या पहिल्या तिमाहीनंतर cumulative Android 5G शिपमेंटबाबत म्हटलं तर सॅमसंग दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनी 76.5 मिलियन स्मार्टफोन्सची विक्री केली आहे.10 / 15यासोबतच 2019 च्या पहिल्या तिमाहित Huawei नं 95.2 मिलियन स्मार्टफोन्सची शिपमेंट केली होती. 11 / 15शाओमी या वर्षी जूनमध्ये पहिल्यांदा जगातील नंबर 1 स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. शाओमीने जूनमध्ये सर्वाधिक स्मार्टफोनची विक्री केली. 12 / 15स्मार्टफोन विक्रीच्या बाबतीत शाओमीने सॅमसंग आणि अॅपललाही मागे टाकले आहे. काउंटरपॉईंट या संशोधन संस्थेने दिलेल्या अहवालात यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. 13 / 15अहवालानुसार, जून 2021 मध्ये शाओमी जागतिक स्मार्टफोन बाजारात आघाडीवर आहे. मागील महिन्याच्या तुलनेत जून 2021 मध्ये शाओमीची विक्री 26 टक्क्यांनी वाढली. 14 / 15जागतिक स्मार्टफोन विक्रीमध्ये शाओमीचा बाजार हिस्सा 17.1 टक्के झाला आहे. त्याच वेळी, सॅमसंगचा बाजार हिस्सा 15.7 टक्के होता, तर Apple बाजार हिस्सा 14.3 टक्के होता. 15 / 15काउंटरपॉईंटच्या अहवालानुसार, जगभरात स्मार्टफोन विक्रीच्या बाबतीत शाओमी दुसऱ्या तिमाहीत नंबर 2 ब्रँड होता. आणखी वाचा Subscribe to Notifications