yes bank crisis anil ambani ilfs essel group have thousand crores npa
कुणी बुडवली येस बँक?, कोणामुळे अडकले खातेधारकांचे कोट्यवधी रुपये? By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 2:59 PM1 / 13कधी काळी ३ लाख कोटींच्या ठेवींसह देशातली पाचव्या क्रमांकाची खासगी बँक असलेली येस बँक आता अडचणीत सापडली आहे. 2 / 13फारसा अर्थविचार न करता कोणालाही कितीही रकमेचं कर्ज देण्यासाठी येस बँक प्रसिद्ध होती. 3 / 13कर्जाची मागणी करणारी कंपनी कितीही तोट्यात असली, दिवाळखोर असली, तरीही येस बँकेकडून कर्ज पुरवठा केला जायचा. 4 / 13बँकेचे संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर नियमांचं फारसं पालन करायचे नाहीत, असं म्हटलं जातं. नियम, कायद्यांऐवजी ते संबंधांना जास्त महत्त्व द्यायचे. 5 / 13आयएल अँड एफएस, अनिल अंबानी समूह यांच्यासारख्यांना येस बँकेनं कर्ज दिली. कंपन्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात न घेता देण्यात आलेली कर्ज पुढे बुडाली. 6 / 13सीजी पॉवर, एस्सार पॉवर, वरदराज सिमेंट यांनी येस बँकेचे हजारो कोटी रुपये थकवले आहेत.7 / 13बँकिंग क्षेत्रापासून शेअर बाजारापर्यंत सगळ्यांना धक्का देणाऱ्या आयएल अँड एफएसनं येस बँकेचे २,४४२ कोटी रुपये थकवले आहेत. हे कर्ज बुडित खात्यात गेलं आहे. 8 / 13अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहातल्या कित्येक कंपन्यांनी येस बँकेकडून कर्ज घेतली. या कंपन्यांनी येस बँकेचे १३ हजार कोटी रुपये थकवले आहेत. 9 / 13एस्सल समूहाकडे येस बँकेची ३,३०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. 10 / 13उद्योग समूहांनी, कंपन्यांनी कर्जाची परतफेड न केल्यानं येस बँक अडचणीत आली. त्यांनी रिझर्व्ह बँकेपासून ही परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न केला. 11 / 13२०१७ मध्ये येस बँकेनं बुडित खात्यात गेलेलं ६,३५५ कोटी रुपयांचं कर्ज रिझर्व्ह बँकेपासून लपवण्याचा प्रयत्न केला. 12 / 13यानंतर रिझर्व्ह बँकेनं कारवाईचा बडगा उगारला. २०१८ मध्ये बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांना ३ महिन्यांसाठी पदावरुन दूर केलं. 13 / 13रिझर्व्ह बँकेच्या कारवाईचा येस बँकेला शेअर बाजारात फटका बसला. त्यांच्या समभागांचं मूल्य ३० टक्क्यांनी घसरलं. आणखी वाचा Subscribe to Notifications