शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Yes बँक, No कॅश... बँकेबाहेर रांगाच रांगा, ग्राहकांच्या डोळ्यात आसू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 11:27 AM

1 / 16
येस बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आर्थिक निर्बंध लागू केल्यानंतर आपल्या ठेवींचे काय होणार, याची चिंता ग्राहकांना लागली आहे
2 / 16
येस बँकेवर निर्बंध लागू झाल्यामुळे बँकेच्या खातेदारांना महिनाभरात ५० हजार रुपये काढता येणार आहेत. बँकेला कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही, तसेच कोणतेही कर्ज देता येणार नाही
3 / 16
कोणत्याही प्रकारची अदायगी बँकेला करता येणार नाही. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून स्टेट बँकेचे माजी अधिकारी प्रशांत कुमार यांनी बँकेचे प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेतला आहे.
4 / 16
दिवसभर देशातील बँकेच्या १,१२२ शाखांमध्ये ग्राहकांचे दूरध्वनी खणखणत होते. त्यातच बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून आरबीआयने बँकेवर प्रशासक नेमल्यामुळे आपल्या ठेवींचे काय होणार ही चिंता व्यक्ती होत होती.
5 / 16
येस बँकेचे मुख्यालय मुंबईत असून बँकेने आपला पूर्वीचा १८००२००० हा टोलफ्री नंबर बदलून आता १८००१२०० केला आहे. बँक आर्थिक संकटात सापडल्याचे व पैसे काढण्यावर बंधने आल्याचे संदेश समाजमाध्यमांवर फिरू लागले आहेत.
6 / 16
भारतीय स्टेट बँकेने आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेला वाचवण्यासाठी तिच्यातील काही हिस्सा खरेदी करण्यात रस दाखवला आहे, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिली आहे
7 / 16
शुक्रवारी येस बँकेच्या समभागांवर विक्रीचा दबाव प्रचंड प्रमाणावर वाढला. त्यामुळे दिवसभरात हा समभाग मुंबई शेअर बाजारात ५६.०४ टक्के कोसळला आणि १६.२० रुपये किंमतीवर बंद झाला
8 / 16
येस बँकेच्या व्यवहारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून आपले पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी बँकेबाहेर रांगा लावल्या आहेत.
9 / 16
बँकेचे एटीएम मशिन्सही बंद झाले असून पेटीएमवरुनही बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. ग्राहकांमध्ये बँक आणि सरकारबद्दल प्रचंड रोष निर्माण झालाय
10 / 16
बँकेवर निर्बंधन लादल्यानंतर बँकेबाहेर सुरक्षाही वाढविण्यात आली आहे, ग्राहकांनी सोशल मीडियावरुनही संताप व्यक्त केला आहे.
11 / 16
कुणाला उपचारासाठी पैसे हवेत, कुणाला लग्नासाठी हवेत, त्यासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत. पण, बँक पैसेच देत नाही
12 / 16
येस बँकेवरील निर्बंधामुळे ग्राहक त्रस्त झाले असून काम-धंदे सोडून थेट बँकेतच जात आहेत.
13 / 16
बँकेच्या ग्राहकांच्या रोषाचा सामना प्रशासनाला करावा लागत आहे, त्यात हिंसात्मक घटना टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
14 / 16
अनेकांनी रडून आपलं दु:ख व्यक्त केलंय, तर अद्यापही संताप व्यक्त होत आहे.
15 / 16
बँकेच्या ठेवीदारांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी दिलासा दिला. ठेवीदारांचे सर्व पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही देतानाच याप्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढण्याचा आरबीआय प्रयत्न करत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
16 / 16
सरकारकडून केवळ अपेक्षा ठेवण्यापलिकडे आता ग्राहकांकडे काहीच उरले नाही, तर किती दिवस वाट पाहायची असा प्रश्न या ग्राहकांना पडलाय
टॅग्स :Yes Bankयेस बँकatmएटीएमMumbaiमुंबई