YES Bank च्या शेअर्मध्ये अचानक तेजी; गुंतवणूकदारांना येणार का 'अच्छे दिन'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 20:16 IST
1 / 7येस बँकेचे (YES Bank) वाईट दिवस आता भूतकाळात गेलेले दिसत आहेत. बुधवारी बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली. बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी शेअर्समध्ये जबरदस्त ट्रेडिंग दिसून आलं. बँकेचा शेअर एका दिवसात चांगलाच वाढला.2 / 7YES Bankचे शेअर्स बुधवारी BSE वर 12.83 टक्क्यांनी वाढून बंद झाले. कामकाजाच्या अखेरच्या सत्रात हे शेअर 14.69 रुपयांवर होते. तर मंगळवारी बँकेचा शेअर 13.02 रुपयांवर बंद झाला होता.3 / 7नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर NSE वर येस बँकेच्या शेअरच्या किमतीतही (Yes Bank Share Price on NSE) चांगली उसळी दिसून आली. एनएससीवर येस बँकेचा शेअर 16.92 टक्क्यांच्या वाढीसह 15.20 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी येस बँकेचा शेअर NSE वर 13 रुपयांवर बंद झाला होता.4 / 7YES Bank च्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये एनएसईवर या शेअरची किंमत 23.08 टक्क्यांनी वाढली. बीएसईवरही या शेअरची कामगिरी चांगली राहिली आहे.यामध्ये 19.24 टक्क्यांची वाढ दिसून आली. 5 / 7येस बँकेचा शेअर एकेकाळी चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे होता. जर आपण गेल्या 5 वर्षातील त्याच्या शेअरच्या किमतीवर नजर टाकली तर ऑगस्ट 2018 मध्ये या शेअरने सुमारे 400 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. मात्र बँकेतील आर्थिक अनियमितता उघडकीस आल्यानंतर आणि बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग उघड झाल्यानंतर बँकेचे वाईट दिवस सुरू झाले.6 / 7आर्थिक अनियमितता समोर आल्यानंतर सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक येस बँकेला बंद होण्यापासून वाचवण्यासाठी पुढे आली. RBI ने 5 मार्च 2020 रोजी बँकेचा ताबा घेतला आणि त्यानंतर बँकेची पुनर्रचना करण्यात आली.7 / 7येस बँकेला वाचवण्याची जबाबदारी सरकार आणि आरबीआयकडून देशातील सर्वात मोठी बँक SBI कडे आली. एसबीआयने येस बँकेतील 49 टक्के हिस्सा खरेदी करून बुडण्यापासून वाचवले. नंतर त्यांनी आपला हिस्सा 30 टक्क्यांपर्यंत खाली आणला.