Yoga Guru to Udyogguru! The journey of Baba Ramdev
योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 11:01 AM1 / 12सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूवर मात करणारे आयुर्वेदिक औषध तयार केल्याचा दावा केल्याने पतंजली योगपीठाचे प्रमुख बाबा रामदेव चर्चेत आले आहे. या औषधावरून अनेक दावे प्रतिदावे होत असून, आसीएमआर आणि आयुष मंत्रालयाने या औषधाच्या जाहीरात आणि विक्रीवर बंदी आणली आहे. 2 / 12दरम्यान, योगमुळे ओळख मिळवणाऱ्या आणि पतंजलीसारख्या ब्रँड निर्माण करणाऱ्या बाबा रामदेव यांनी आतापर्यंतच्या प्रवासात अनेक चढउतार पाहिले आहेत. त्यांना जशी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. तसेच त्यांच्यावरून अनेक वादविवादही निर्माण झाले. अल्पावधीत योगगुरू ते उद्योगगुरू असा प्रवास यशस्वी करून दाखवणाऱ्या बाबा रामदेव यांच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा 3 / 12एका सामान्य कुटुंबात जन्मलेले बाबा रामदेव एकेकाळी सायकलवरून फिरत च्यवनप्राश विकायचे, असे सांगितल्यास आज खरे वाटणार नाही.. पण सुरुवातीच्या टप्प्यात बाबा रामदेव आपले सहकारी आचार्य बाळकृष्ण यांच्यासोबत सायकलवरून फिरून च्यवनप्राश विकत असत. पुढे त्यांनी योग प्रशिक्षण शिबीरांचे आयोज करण्यास सुरुवात केली. तसेच पतंजलीला एक व्यापारी कंपनी म्हणून उभे केले. 4 / 12मुळचे हरियाणातील असलेले बाबा रामदेव अभ्यासात हुशार होते. त्यांच्यावर दयानंद सरस्वती यांच्या सत्यार्थ प्रकास या पुस्तकाचा प्रभाव होता. पुढे त्यांनी सरकारी शाळेतील शिक्षण सोडले आणि घरातून पळून जात त्यांनी गुरुकुलात प्रवेश घेतला. योगचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी योगचे धडे देण्यास सुरुवात केली. 5 / 12पुढे हरिद्वार येथे आल्यानंतर बाबा रामदेव यांनी सुमारे २५ वर्षांपू्वी संन्यास घेतला. ते कनखल आश्रमता राहू लागले. तिथे त्यांचे अनेक सहकारीही होती. मात्र ही व्यक्ती पुढे जाऊन योग प्रशिक्षणाची ओळख बनेल, तसेच आयुर्वेदिक उत्पादनांचे साम्राज्य उभे करेल, असे कुणाला वाटलेही नसेल. 6 / 12आपल्या यशस्वी वाटचालीची सुरुवात बाबा रामदेव यांनी योग प्रशिक्षणापासून केली. मात्र त्यावेळी त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात फारशी गर्दी होत नसे. हळुहळू त्यांच्याकडे योगचे प्रशिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली. मग योग शिकवण्यासाठी बाबांनी अल्प शुल्क आकारण्यास सुरुवात केली. तसेच टीव्हीवरूनी ते योगचे धडे देऊ लागले. त्यामुळे बाबांची कमाई वाढलीच, सोबतच त्यांची लोकप्रियताही प्रचंड वाढली. 7 / 12बाबा रामदेव यांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे पतंजली आयुर्वेदची स्थापना केली. तसेच आयुर्वेदिक उपचार केंद्रही सुरू केले. तसेच आचार्य बाळकृष्ण यांच्यासोबत मिळून या आयुर्वेदिक औषधांता प्रभावी प्रचार आणि प्रसार केला. बाबा रामदेव यांचे अनुयायीसुद्धा लक्षणीय असल्याने त्याचाही पतंजलीला फायदा झाला. 8 / 12बाबा रामदेव यांनी हरिद्वार येथे आयुर्वेदिक रिसर्च सेंटरचीसुद्धा स्थापना केली. ३ मे २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या केंद्राचे उदघाटन केले होते. राजकीय संपर्काचा बाबा रामदेव यांना खूप फायदा झाला. त्यामुळे त्यांना व्यवसायात सुविधा तर मिळाल्याच सोबतच आयुर्वेदिक औषधांच्या बाजारात त्यांचा दबदबा निर्माण झाला. 9 / 12 आयुर्वेदिक औषधांच्या व्यवसायात जम बसल्यानंतर पतंजलीने घरगुती दैनंदिन वापरातील वस्तूंकडे आपले लक्ष वळवे. दंतमंजन, पावडर, क्रीम, शाम्पू यासारखी उत्पादने पतंजलीमध्ये बनू लागली, तसेच या वस्तूंना बाजारात मागणीही वाढली. 10 / 12त्यादरम्यान, बाबा रामदेव स्वदेशी मोहिमेशी जोडले गेले. त्यांनी स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्याचे आवाहन ते करू लागले. त्यादरम्यान, पतंजलीमध्ये बनणाऱ्या औषधांचा स्वदेशी म्हणून त्यांनी खूप प्रचार केला. त्यामुळे पतंजलीचा कारभार प्रचंड वाढला. 11 / 12पतंजलीच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी बाबा रामदेव यांनी देशातील बहुतांश छोट्या मोठ्या शहरात पतंजलीचे स्टोअर्स सुरू केले. त्यामाध्यमातून त्यांनी आपल्या उप्तादनांच्या मार्केटिंगची मोठी साखळी उभी केली. 12 / 12कधीकाळी सायकलवरून च्यवनप्राश विकणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजलीची ब्रँड व्हॅल्यू आज अब्जावधी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. २०१५-१६ या वर्षात बाबा रामदेव यांच्या पतंजलीची कमाई पाच हजार कोटींच्या पुढे गेली होती. आज देशातील अनेक राज्यांमध्ये पतंजलीचे प्लँट आहेत. तसेच आसाममधील तेजपूर येथे पतंजलीकडून १८० एकरच्या परिसरात फूड पार्क बनवण्यात येत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications